shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

खानवटे सोसायटीच्या चेअरमनपदी लता ढवळेः प्रथमच महिलेची चेअरमनपदी निवड

खानवटे सोसायटीच्या चेअरमनपदी लता ढवळेः 
प्रथमच महिलेची चेअरमनपदी निवड


(भिगवण:प्रा.सागर घरत).    
खानवटे(ता.दौंड) येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी लता दिपक ढवळे यांची तर व्हाईस चेअरमनपदी प्रमोद नामदेव लोखंडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. खानवटे सोसायटीच्या इतिहासामध्ये प्रथमच महिलेची सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संचालक, सभासद व ग्रामस्थांच्या वतीने विशेष अभिनंदन होत आहे.
खानवटे(ता.दौंड) येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन हनुमंत पवार व व्हाईस चेअरमन सोमनाथ पोटफोडे यांनी निर्धारित कार्यकाल पुर्ण केल्यानंतर पदाचा राजीनामा दिल्यामुळे ही पदे रिक्त होती. रिक्त चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडणुकीसाठी सोसायटीची संचालकांची बैठीक बोलाविण्यात आली होती. यावेळी अर्ज करण्यासाठी देण्यात आलेल्या निर्धारित वेळेत चेअरमन पदासाठी लता दिपक ढवळे यांचा तर व्हाईस चेअरमनपदी प्रमोद नवनाथ लोखंडे यांचे एकमेव अर्ज आल्यामुळे लता ढवळे यांची चेअरमन तर प्रमोद लोखंडे यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड करण्यात आल्याचे जाहिर करण्यात आले. यावेळी अण्णासाहेब राजेभोसले, मच्छिंद्र पोटफोडे, अशोक गायकवाड, हनुमंत पवार,विजयसिंह राजेभोसले किशोर माहुरकर, भिमराव पवार, बापुरात थोरात, दिपक ढवळे, अंकुश माहुरकर, रामचंद्र कन्हेरकर, विलास ढवळे, रंगनाथ ढवळे, शंकर ढवळे, दादा लोखंडे  आदीसह संचालक मंडळ उपस्थित होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन प्रकाश शितोळे यांनी काम पाहिले तर बैठकीचे संयोजन संस्थेचे सचिव रमेश शिंदे यांनी केले. निवडीनंतर सभासदांच्या वतीने नुतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. संचालक मंडळाने विश्वास दाखवुन संस्थेच्या प्रथम महिला चेअरमन होण्याचा मान मला दिला आहे. सर्व संचालक मंडळ व सभासदांना विश्वासात घेऊन संस्थेचा कारभार पारदर्शीपणे करण्याचा तसेच सभासदांना अधिकाधिक लाभांश मिळवुन देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नुतन चेअरमन लता ढवळे यांनी निवडीनंतर बोलताना सांगितले.
close