shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

लिटल चॅम्पस शाळेत स्नेहसंमेलन रंगले


पैठण प्रतिनिधी: 
एमआयडीसी परीसरातील पिंपळवाडी फाटा येथील " लिटल चॅम्पस नॅशनल इंग्रजी शाळेत " नुकतेच स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतिक कार्यक्रमात नर्सरी ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थी- विद्यार्थीनीनी सहभाग घेतला होता. सांस्कृतिक कार्यक्रमात नवीन- जुने हिंदी- मराठी गीतावर सहभागी विद्याथ्र्यानी बहारदार नृत्यु आणि अभिनय सादर करून उपस्थित विद्यार्थी- पालकांना मंत्रमुग्ध केले.

यावेळी " लिटल चॅम्पस नॅशनल " इंग्रजी शाळेचे संस्थापक अध्यक्ष शेख युनूस मंजूरभाई यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुण्याचे व उपस्थित मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. 
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून पैठण पंचायत समितीचे सदस्य विशाल थोटे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिध्द ग्रामीण साहित्यिक अय्युब पठाण लोहगांवकर हे होते. तसेच व्यासपीठासमोर प्रमुख अतिथी म्हणून कलीम इनामदार, दादाराव गलांडे, रमेश शेळके इत्यादि मान्यवर उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यक्रमातील सहभागी विद्याथ्र्याना मान्यवरांच्या हस्ते मेडल व प्रमानपत्र सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले.कार्यक्रम यशस्वी करण्यास शाळेच्या संचालिका श्रीमती समीरा युनूस शेख तसेच मुख्याध्यापिका वर्षा गिऱ्हे, तसेच शिक्षिका - दिपाली तुपकरी, बुशरा शेख, आरती चाबुकस्वार, शितल रोडी, अंकीता अवचर, पुनम गोरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका बुशरा शेख यांनी केले तर आभार प्रदर्शन दिपाली तुपकरी यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास परीसरातील नागरीक, पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.

*पत्रकार हारुन के.शेख - पैठण*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर 
close