shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

इंदापूरच्या इतिहासाला गती मिळणार - सुनेत्रा पवार

इंदापूरच्या इतिहासाला गती मिळणार - सुनेत्रा पवार
इंदापूर:- आजच्या दिवसाची सुरुवात वीरश्री मालोजी राजे गढीला  भेट देऊन  त्यांच्या चरणी नतमस्तक होते. छत्रपती शिवाजी महाराज यांची आजोबा वीरश्री सरदार मालोजीराजे यांचा वास्तव्याने पावन झालेली इंदापूर ही ऐतिहासिक भूमी आहे. या मातीला त्यांच्या पराक्रमाचा वारसा आहे. इंदापूरच्या गढीतून भोसले घराण्याचा वंशवेल विस्तारला आणि मालोजीराजे यांच्या पोटी शहाजी आणि शरीफजी हे पुत्ररत्न जन्मले. यांना समर्थशाली इतिहास घडवला. या ऐतिहासिक भूमीत आल्यावर खऱ्या अर्थाने चैतन्याची अनुभूती मिळाली . वीरश्री मालोजीराजे यांच्या ऐतिहासिक गढीसाठी आत्ताच्या अर्थसंकल्पामध्ये उपमुख्यमंत्रीअजित पवार यांनी ३७ कोटी २८ लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. त्यामुळे या गढीचे रुपडं पलटणार आहे. त्याचबरोबर इंदापूरच्या इतिहासाला गती मिळणार आहे.
असे इंदापूरच्या इतिहासाबद्दल गौरवोद्गार बारामती हायटेक टेक्स्टाईल च्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी इंदापूर येथील वीरश्री मालोजी राजे गडी येथे  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना काढले. त्यांनी यावेळी चांदशहावाली बाबा यांच्या दर्ग्याचे प्रशन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज व वीरश्री मालोजीराजे यांच्या प्रतिमेस  पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
 कार्यक्रमाप्रसंगी इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, प्रताप पाटील,  श्रीमंत ढोले,सचिन सपकळ, दत्तात्रय घोगरे, नवनाथ रुपनवर,  संदेश देवकर,आरपीआयचे शिवाजी मखरे बाळासाहेब सरवदे, संग्राम पाटील शिवाजी तरंगे, भागवत काटकर, अण्णासाहेब धोत्रे,विठ्ठल ननवरे,धनंजय बाब्रस , श्रीधर बाब्रस,दादासाहेब सोनवणे, आझाद पठाण, हमीद आत्तार ,महादेव चव्हाण, जाफर मुजावर , महमुद मुजावर ;मुनीर मुजावर  राहुल गुंडेकर, वसीम बागवान, मारुती मारकड, राजेंद्र चौगुले ,उज्वला परदेशी, महिला अध्यक्ष केकान . शुभम निंबाळकर, सचिन खामगळ, संजय चव्हाण, संजय रुपनवर व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 ---------------------------------------
तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या जोरावर अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात  कधीही मागं वळून पाहिलं नाही - सुनेत्रा पवार.

आमचं काटेवाडी गाव हे इंदापूरच्या सीमेवर आहे .त्यामुळे आमचा आणि इंदापूरकरांचं नातं हे शिवथडीचं नातं आहे. त्यामुळे मला इंदापूर बाबत अधिकचा जिव्हाळा आहे .त्यामुळे मला माहित आहे की, अजित पवार यांचे इंदापूरकरावर किती प्रेम आहे. कारण मी गेली दोन-तीन दिवस या तालुक्यात दौऱ्यासाठी आले .तेव्हा जो निधी मामांच्या मार्फत जो आलेला आहे .ते बघून असं वाटतं की अजित पवार यांचे  इंदापूरवरती जास्त प्रेम आहे.
 अभिमान वाटतो की ,इंदापूर तालुक्याच्या हद्दीत असणाऱ्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणून अजितदादा पवार यांनी राजकीय सहकार आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी यशस्वीपणे प्रवेश केला आणि त्यांची राजकीय कारकीर्द या टप्प्यावर पोचली आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाच्या आणि आशीर्वादाच्या जोरावर अजितदादा पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांनी कधीही मागं वळून पाहिलं नाही. त्यामुळे दादांचे इंदापूरकरावरती अधिक प्रेम आहे. इंदापूरकरांच्या विकासाच्या माध्यमातून ते आपले कर्तव्य बजवण्यात प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत.
इंदापूर तालुक्याचे प्रश्न सोडवण्यासाठी अजितदादा पवार कायमच तत्पर असतात .नीरा डाव्या कालव्याच्या आवर्तनाचा प्रश्न असो. नाहीतर लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजना मार्गी लावण्याचा विषय असो. त्यांनी कायमच इंदापूरकरांच्या भल्याचा विचार केलेला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील बंधाऱ्याच्या दुरुस्तीचे काम सुद्धा हाती घेण्यात आलेल्या आहे. सगळ्यात महत्त्वाचा निर्णय म्हणजे उजनी बॅकवॉटर च्या मोठ्या पुलाला आदरणीय दादांच्या निर्देशनानुसार मंजुरी देण्यात आलेली आहे. इंदापूर तालुक्यातील शिरसोडी आणि करमाळा तालुक्यातील कुगावला जोडणाऱ्या पुलाच्या कामकाजासाठी ३९७ कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला. या पुलामुळे इंदापूर आणि करमाळा तालुक्यातील जनतेची दळणवळणाची गैरसोय दूर होणार आहे. 
----------------------------------
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासाचं काम सुरू - सुनेत्रा पवार

आपले नेते राज्याचे उपमुख्यमंत्री दादांच्या माध्यमातून राज्याच्या सर्वांगीण विकासाचं काम सुरू आहे .राज्याच्या विकासासाठी ते आणि त्यांचे सहकारी अहोरात्र प्रयत्न करीत आहेत. त्यांना साथ देण्यासाठी आणि विकासाचा महामेरू पुढे नेण्यासाठी आपल्या सगळ्यांनाच मनापासून प्रयत्न करायचे आहेत. मी गेले दोन दिवस तुम्हाला हे सांगते आपण सगळेजण कसोसीने यामध्ये आहात .आपण हेच प्रेम हेच पाठबळ देत राहणार आहात आणि द्याल ही अपेक्षा आणि खात्री बाळगते.
----------------------------------------
पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर बोलताना म्हणाले की, बारामती लोकसभा मतदारसंघ हे खऱ्या अर्थाने ऐतिहासिक मतदारसंघ राजकीय दृष्ट्या जरी असला तरी ऐतिहासिक सुद्धा इतिहास बद्दल जर आपण आपण पाहिलं तर त्या पद्धतीचा या मतदारसंघांमध्ये खूप काही असलेलं शिवकालीन खना- खुना, गड किल्ले, मंदिर, समाधी हे आपल्याला बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये आहे. या निमित्ताने आम्ही असे एक निर्णय केला की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार सर्वत्र अशा जास्तीत जास्त ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करून आणि त्या त्या ठिकाणी जाऊन पुष्पवृष्टी करू आणि यासाठी म्हणून आज सुनेत्रा पवार आल्या. त्याचबरोबर आपल्या तालुक्याचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी या गढीचा विकास करण्यामध्ये एक प्रचंड मोठं योगदान आहे आणि शासनाने देखील आपल्या विनंतीला मान देऊन निधी या गढीला भरपूर मोठ्या प्रमाणात दिला असून येणाऱ्या वर्ष दीड वर्षाच्या कालावधीमध्ये या ठिकाणी या गढीचा पूर्ण विकास होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी दत्तात्रय भरणे यांचे सुद्धा आणि  अजितदादा पवार यांचे सुद्धा या गढीच्या साठी जो काही विकासाचा निधी जो उपलब्ध करून दिला आहे त्याबद्दल मनःपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतो. छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार होत असणारी शिवजयंतीच्या निमित्त सर्व असलेल्या या राज्यातील देशातील सर्व बांधवांना भगिनींना मनापासून च्या शुभेच्छा व्यक्त करतो.
close