shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्रीरामपूरच्या चारही बाजूचे रस्ते चौपदरी केले - आमदार कानडे


*सूतगिरणी फाटा बस थांब्याचे उद्घाटन संपन्न*

श्रीरामपूर प्रतिनिधी :
बाभळेश्वर ते नेवासा फाटा हा १६७ कोटी रुपयांचा रस्ता आपण पूर्ण केला आहे. श्रीरामपूरच्या चारही बाजूचे रस्ते आता चौपदरी केले आहेत. एमआयडीसी मध्ये चौदा कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामे लवकरच सुरू होत आहेत. मागील अनुभव लक्षात घेता अगोदर जाहीर केलं की इतर लोक श्रेय घ्यायला तयार असतात, म्हणून अगोदर जाहीर न करता आधी मंजूर करून घेऊन थेट उद्घाटन करायचं असं धोरण सध्या मी घेतलं आहे.

श्रीरामपूर - दत्तनगर स्ट्रीट लाईटचे उद्घाटन ही लवकरच होणार आहे. सूतगिरणी फाटा येथे बस थांबा असावा अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस प्रताप देवरे यांनी खूप दिवसापासून लावून धरली होती. तिला यश आले व आज आपण या बस थांब्याचे उद्घाटन करीत आहोत. तालुक्यामध्ये बस थांब्यासाठी देखण्या मॉडेलचे शेड आपण तयार केले आहेत. येथे सुद्धा आपल्या मागणी नुसार बस थांबा शेड बांधून देणार असल्याची घोषणा तालुक्याचे आमदार लहू कानडे यांनी केली.
संगमनेर रोडवर सूतगिरणी फाटा येथे जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस प्रताप देवरे यांच्या सततच्या पाठपुराव्यातून राज्य परिवहन महामंडळाने बस थांबा मंजूर केला आहे. या बस थांब्याचे उद्घाटन आमदार कानडे यांच्या हस्ते काल संपन्न झाले. त्या प्रसंगी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ उपाध्यक्ष सचिन गुजर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ज्ञानेश्वर मुरकुटे, श्रीरामपूर एसटी डेपोचे व्यवस्थापक महेश कासार तसेच संसारे आदि प्रमुख उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार कानडे म्हणाले कि मी प्रशासनामध्ये कधी हस्तक्षेप केला नाही. त्यामुळे कामे पटापट होतात. फोन केला कि कामे मार्गी लागतात. तालुक्यातील रस्ते आता चांगले झाले आहेत. त्यामुळे एस टी वेगात आणि धोरणात चालणार आहे. लोकहिताच्या दृष्टीने शाश्वत व दीर्घकाळ टिकणारा सुंदर विकास करण्याचा प्रयत्न आपण केला. या कामी तालुक्याने सुद्धा आपल्याला मोठी साथ दिली. त्याबद्दल त्यांनी तालुक्यातील जनतेला धन्यवाद दिले.
प्रस्ताविक करताना जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस प्रताप देवरे यांनी सांगितले कि सूतगिरणी फाटा हा परिसरातील सात ते आठ वसाहतींचा भाग आहे. परंतु येथे बस थांबा नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. लोकांना दोन किलोमीटर बसस्थानक येथे जावे लागत होते.गेली दोन वर्ष सतत पाठपुरावा केल्यानंतर आमदार कानडे यांच्या सहकार्याने हा बस थांबा येथे मंजूर झाला आहे. येथे आता आमदार कानडे यांनी आमदार निधीतून बस थांबा शेड बांधून द्यावे अशी मागणी त्यांनी केली, ती मागणी आमदार कानडे यांनी लगेच मंजूर केली.
या कार्यक्रमाला त्रंबकपूर ग्रामपंचायतचे सरपंच बबन आढाव, उपसरपंच विलास कोळगे, रावसाहेब पवार गुरुजी, प्रकाश सावंत, चंद्रकांत मगरे, दीपक कदम,डि एल भोंगळे, सुगंधराव इंगळे, नानासाहेब रेवाळे, लक्ष्मण रणदिवे, सुखदेव पावसे, रितेश काटे, दिलीप मोरगे, नानासाहेब दांगट, लक्ष्मण मोहन, समाधान नरोडे, सुनील शिरसागर, मुन्ना पिंजारी, संजय गायकवाड, प्रमोद गाडेकर, सुरेश कांबळे, पिनू देशमुख,कैलास थोरात यांचे सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
दरम्यान गेल्या अनेक वर्षाची मागणी मंजूर होऊन या भागातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर केल्याबद्दल जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस प्रताप देवरे यांना परिसरातील नागरिकांनी धन्यवाद दिले आहेत.


*पत्रकार दीपक कदम - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close