इंदापूरात अविरत व्यसनमुक्तीसाठी व्यसनाची होळी
इंदापूर:- युवा क्रांती प्रतिष्ठानच्या पुढाकाराने गेली तेरा वर्ष अविरत व्यसनमुक्तीसाठी व्यसनाची होळी हा उपक्रम इंदापूर शहरांमध्ये राबवला जातो. दिनांक २४ मार्च २०२४ रोजी होळीची औचित्य साधून इंदापूर बस स्टँड येथे युवा क्रांती प्रतिष्ठानच्या वतीने व्यसनाची होळी हा उपक्रम राबविण्यात आला व्यसन न करण्याची शपथ घेऊन प्राध्यापक धनंजय देशमुख व्यसनमुक्त युवक संघ महाराष्ट्र राज्य यांनी तसेच युवा क्रांती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत सितापं यांनी व्यसनमुक्तीवर प्रबोधन केले.
इंदापूर एसटी स्टँडच्या आवारात व्यसनमुक्तीचे बॅनर घेऊन प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून ही अन्याय अत्याचार भ्रष्टाचार जातीयवाद व्यसनाधीनता याची दहन करण्याची होळी करण्यात आली धरमचंद लोढा आझाद पटेल मल्हारी गाडगे निलेश पर्वत ज्ञानदेव डोंगरे बाळासाहेब शिरसागर हमीद भाई अत्तार सुरज वीर व मोठ्या संख्येने तरुण वर्ग या विधायक उपक्रमास उपस्थित होता.