shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने महिला दिनाच्या नारीशक्ती सन्मान सोहळा


गुरुवर्य रामगिरी महाराज यांना संत कौस्तुभ पुरस्कार 
शिर्डी ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने संत कौस्तुभ पुरस्कार २०२४ व नारी शक्ती सन्मान सोहळा १० मार्च रोजी शिर्डी येथे आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे यांनी दिली. 

      महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने सरला बेटाचे मठाधीपती प.पु. रामगिरी महाराज यांना संत कौस्तुभ पुरस्कार २०२४ देऊन गौरविण्यात येणार आहे. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे प्रदेश सरचिटणीस संग्राम कोते, व्याख्याते प्रदीप कदम, पत्रकार संघाचे नवी मुंबई विभागीय अध्यक्ष दशरथ चव्हाण, साईबाबा संस्थान कर्मचारी सोसायटी चेअरमन विठ्ठल पवार, स्वामी शिरकुल वैदू, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव हे प्रमुख उपस्थित राहणार आहे.
     यावेळी सामाजिक व शैक्षणिक कार्य रामचंद्र मारुती सुपेकर, ओतूर गावचे युवा उपसरपंच प्रशांत डुंबरे, आदिवासी भागात वैद्यकीय सेवा डॉ. सुभाष सोमण, शिक्षण अधिकारी दिलीप थोरे, युवा उद्योजक राहुल भास्कर पाबळकर यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. नारी शक्ती सन्मान सोहळ्यात शिर्डी च्या नगरसेविका सौ वंदना राजेंद्र गोंदकर सामाजिक व राजकीय कार्य, सौ रजनी रघुनाथ गोंदकर समाजिक व शैक्षणिक कार्य,  जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष संपूर्णा सावंत सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्र कार्य, राहता येथील डॉ राधा गमे वैद्यकीय व समाजिक, राजकीय क्षेत्रात  कार्य, लोणी येथील श्रीमती सुनिता तांबे-योगा आध्यात्मिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य, पत्रकारिता क्षेत्रात दै.राष्ट्र सह्याद्री च्या कार्यकारी संपादक, न्यूज अँकर सौ. पूनम करण नवले, पत्रकार संघच्या कायदेशीर सल्लागार ऍड रचना भालके, दै. केसरी च्या संगमनेर च्या प्रतिनिधी नीलिमा घाडगे, दै. बाळकडू च्या पारनेर प्रतिनिधी सौ निलम खोसे पाटील, बचत गटाचे सामाजिक कार्या बद्दल सौ पल्लवी कदम , विडी बांधून आपले तीन मुलांना शासकीय अधिकारी करणारी आदर्श माता सौ. शांता अशोक शेळके, विडी कामगार चळवळ साठी व शेतीतील कार्याबद्दल सौ. सखुबाई पुंजा वाकचौरे, पत्रकार यांच्या पत्नी सौ. अस्मिता दशरथ सोनवणे, अफगाण फायक अली सय्यद जामखेड, आरोग्य रक्षक पुणे सौ. अपेक्षा नवनाथ जाधव, बचत गट, राहुरी अध्यक्ष सौ. कविता प्रसाद मैड, वृत्तपत्र विक्रत्या सौ. गिरीजा रामकृष्ण लोंढे, अंतरभारती शिक्षण संस्था विरगांव च्या विश्वस्त सौ. गीता अनिल राहणे, बाल मानसशास्र तज्ञ सौ. स्वप्ना मनीष जाधव कोपरगाव, प्रवचनकार सौ. रेश्मा कुंडलिक वाळेकर संभाजीनगर, संजीवनी पतसंस्था भोकर माजी चेअरमन सौ मीनाक्षी चंद्रकांत झुरंगे, रेणुका माता भजनी मंडळ, भावी निमगाव अध्यक्ष सौ उषा रावसाहेब मरकड, वाडळा महादेव ग्रामपंचायत च्या माजी सदस्या सौ. मीनाक्षी राजेंद्र देसाई, शिक्षिका सौ. शर्मिला दत्तात्रय गाडगे पारनेर, शिक्षिका सौ. शोभा दत्तात्रय राऊत जामखेड, कृषी सहाय्यक सिन्नर सौ. कुसुम विजय शेळके तांबे, आरंभ फाउंडेशन जामखेड च्या सौ. रोहिणी ओंकार दळवी, बचत गट देहू च्या अध्यक्ष सौ. अरुणा ज्ञानेश्वर नवले, सौ. उर्मिला स्वानंद चत्तर संगमनेर, सौ. स्नेहल मोहन गायकवाड नेवासा, सौ. सोनिया अमोल म्हस्के, सौ. बेबी विनोद गायकवाड टाकळी ढोकेश्वर , समीना फिरोज मालजप्ते श्रीगोंदा , सुंदर चप्पल ओतूर च्या संचालिका सौ मंगल रवी गजे, सौ. रुपाली अशोक उगले डोंगरगाव, शिक्षिका सौ. वंदना सचिन लगड, सौ.सुनीत राहुल फुंदे शिर्डी, गो शाळेतील कार्य सौ. आरती भागवत खोल्लम कोतुळ, सौ. मीना जगन्नाथ आहेर, कविता विठ्ठल उदावंत नेवासा, मनीषा भारत अस्वार जुन्नर यांना जाहीर करण्यात आला आहे.
तरी सर्वांनी या कार्यक्रमांस उपस्थित रहावे असे आवाहन पत्रकार संघाचे वतीने करण्यात आले आहे.
close