इंदापूरच्या जेष्ठ नागरिकांची प्रयागराज अयोध्या काशी तीर्थक्षेत्राची दर्शनवारी यशस्वी
इंदापूर : इंदापूर शहरातील जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने प्रयागराज त्रिवेणी संगम, अयोध्या श्री राम जन्मभूमी दर्शन व वाराणसी काशी विश्वनाथ दर्शन व या तीन तीर्थक्षेत्र दर्शन वारीचे सात दिवस आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शहरातील १२० जेष्ठ नागरिकांनी आनंद घेतला.
यावेळी दर्शनवारीला निघताना आमदार दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा, नागरी संघर्ष समितीचे कृष्णा ताटे, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष राकेश गानबोटे, ॲड. नलवडे वकील यांनी इंदापूर येथे, सर्व जेष्ठ नागरिकांना पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चित्तरंजन ( आबा ) पाटील व उपाध्यक्ष अशोक ( नाना ) गानबोटे व अंकुश ढुके यांच्या मार्गदर्शनाखाली सहलीचे नियोजन करण्यात आले होते. तर ज्येष्ठ नागरिक संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर, सचिव हनुमंत शिंदे, तसेच सहलप्रमुख काशीनाथ जगताप, बाबासाहेब घाडगे, भाऊसाहेब खबाले, भारत बोराटे, छाया जाधव, भानुदास पवार, दत्तात्रय चांदणे यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमाने सहल उत्साहात पार पडली.
यावेळी यामध्ये ४० महिला व ८० पुरुष जेष्ठ नागरिकांनी, प्रयागराज येथे त्रिवेणी संगम पंडित जवाहरलाल नेहरू स्मारक, हनुमान मंदिर येथे व धार्मिक पूजा विधी केले. अयोध्येतील प्रभू श्रीराम यांचे नवीन मंदिरात दर्शन घेतले. कनक भवन, शरयु नदी येथे धार्मिक पूजा विधी करून बनारस कडे प्रयाण केले. वाराणसी येथे श्री काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले.अन्नपूर्णा मातांचे दर्शन घेतले. त्यानंतर थेट रेल्वेने दौंड येथे पोहचले.