श्रीरामपूर प्रतिनिधी:
छत्रपती शिवराय हे सतराव्या शतकातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सेनापती होते. उण्यापुऱ्या पन्नास वर्षाच्या हयातीत त्यांनी जगातील सर्व प्रमुख योद्ध्यांचा पराभव केला. उत्तम व्यवस्थापन हे शिवरायांच्या यशाचे गमक होते. छत्रपती शिवाजी महाराज हे ग्रामविकासाचे प्रवर्तक होते. तसेच ख-या अर्थाने शेतकयांचे कैवारी होते, असे प्रतिपादन अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी केले.
लोकसेवा विकास आघाडीच्या वतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमात श्री.मुरकुटे बोलत होते. यावेळी अशोक बँकेचे चेअरमन अॅड्.सुभाष चौधरी, लोकसेवा विकास आघाडीचे शहर अध्यक्ष नाना पाटील, अॅड्.पृथ्वीराज चव्हाण, नानासाहेब मांढरे, संजय लबडे, भगवान सोनवणे, प्रवीण फरगडे, नानासाहेब गांगड, संकेत संचेती, प्रमोद करंडे, नितीन खंडागळे, बाळासाहेब शिंदे, विशाल धनवटे, बाबा वायदंडे, संदीप डावखर, अमोल कोलते, नवाब सय्यद, वैभव सुरडकर, मुक्तार शाह, बाळासाहेब लोंढे, कैलास भागवत, रामदास सलालकर, जयेश परमार, लाला देवी, राजेंद्र फरगडे, बाळासाहेब लबडे, पंकज देवकर, सोहम मुळे, संजय वेताळ, प्रशांत लहामगे आदी उपस्थित होते.
प्रारंभी माजी आ.श्री.मुरकुटे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी ते पुढे म्हणाले की, शिवरायांनी मोजक्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली. सतत संघर्ष करीत स्वराज्य निर्माण केले. चारशे वर्षांपूर्वी त्यांच्या वाटेला मोठा संघर्ष आला व त्या संघर्षाला सामोरे गेल्यानेच शिवराय आजही तुमच्या आमच्या हृदयात विराजमान आहेत. तुम्ही जग बदलण्याचा प्रयत्न केला तर कुठेही परिवर्तन दिसणार नाही. परंतु स्वतःला बदलण्यात यश मिळवल्यास जग आपोआपच बदललेले दिसेल, असे ते म्हणाले.
*पत्रकार अमोल शिरसाठ - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111