shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

निर्मिती समुहातर्फे महिला दिनानिमित्त संगमनेरमध्ये महिला मेळावा संपन्न..!


संगमनेर प्रतिनिधी:
निर्मिती समूह म्हणजे निर्मिती महिला औद्योगिक सहकारी संस्था आणि निर्मिती महिला नागरी सहकारी पतसंस्था या दोन्ही संस्थांच्या संयुक्ताने ७ मार्च २०२४ गुरुवार रोजी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिला मेळाव्याचे कुबेर लॉन्स संगमनेर खुर्द येथे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दुर्गाताई तांबे तर प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध कवयित्री आणि लेखिका छायाताई कोरेगावकर काँग्रेस महिला अध्यक्ष अर्चनाताई बालोडे ॲड. सीमा काळे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निर्मिती औद्योगिक सहकारी संस्थेच्या चेअरमन छायाताई ढगे तर निर्मिती नागरी पतसंस्थेचे चेअरमन ॲड. प्रज्ञा लामखडे यांनी केले.

                जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता. महिलांना मुक्तपणे विचार मांडता यावे यासाठी सर्वसामान्य महिलांना व्यासपीठ खुले ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या छायाताई कोरेगावकर महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की निर्मितीचा मध्यंतरीचा संघर्ष मी खूप जवळून बघितला. इवल्याशा चिमण्या घारीला भेटल्या. स्री शक्तीचा, एकजुटीचा विजय झाला. स्त्रियांच्या कर्तुत्वाला अनेक अडथळे येतात. तिला नैसर्गिक मातृत्व लाभलेला आहे. धर्म -धार्मिक रूढी -परंपरांमध्ये बायका अडकून पडल्या आहेत. आता काळानुसार सणांचे स्वरूप आणि सौंदर्याच्या कल्पनाही बदलल्या पाहिजे. कारण आपण सावित्रीच्या वारसदार आहोत.
ॲड. सीमा काळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की समाजाच्या आर्थिक व सामाजिक इतिहास  बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आपल्या स्वाभिमानाला धक्का न लावता कुटुंबाला पुढे घेऊन जाणे काळाची गरज आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना सांगितले की आपण ८ मार्च जागतिक दिन  दिन का साजरा करतो याची सविस्तर माहिती सांगितली. पुढे जाऊन त्यांनी सांगितले की आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, अहिल्याबाई होळकर यांचे अतोनात कष्ट, त्याग आणि योगदान यामुळे आज आपण मुक्तपणे मोकळा श्वास घेत आहोत. आपण सर्व महिलांनी एकमेकींना जीव लावून ,साथ देऊन आलेल्या संकटांना सामोरे गेलं पाहिजे, तर खऱ्या अर्थाने ८ मार्च साजरा के साजरा केला जाईल. तेच खऱ्या अर्थाने प्रेरणादायी असेल त्यांनी सांगितले
            या महिला मेळाव्यामध्ये संगमनेर तालुक्यातील ११ गावातील महिला उपस्थित होत्या याशिवाय दोन्ही संस्थेचे संचालक मंडळ, पोलीस महिला पोलीस मित्र टीम व इतर बचत गटातील महिला या आवर्जून उपस्थित होत्या. या मेळाव्याचे वेगळेपण हे होते की कुरकुंडी खांडगाव, संगमनेर खुर्द, चंदनापुरी, साईनगर येथील महिलांनी नाटक, एकपात्री प्रयोग आणि नृत्य सादर केले. त्यामुळे रंगीबेरंगी वातावरणाने कार्यक्रम बहरून आला. सर्वात शेवटी प्रणालीताई भालेराव यांनी आभार प्रदर्शन करून सामूहिक नृत्याने कार्यक्रमाची सांगता  अतिशय उत्साहाने करता आली.  सर्वात शेवटी स्नेहभोजनाचा आनंद घेऊन महिलांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचा हसतमुखाने निरोप घेतला.

*पत्रकार लियाकतखान जी. पठाण - संगमनेर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close