shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

मीनाक्षी देसाई यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने नारी शक्ती पुरस्कार जाहिर


 श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील सौ.मीनाक्षी राजेंद्र देसाई यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने नारीशक्ती पुरस्कार जाहीर करण्यात आला.


 सौ. मीनाक्षी देसाई यांनी ग्रा. प. वडाळा महादेव तसेच रेणुका महिला हरिपाठ मंडळ यांच्या माध्यमातून श्री क्षेत्र सराला बेट तसेच महाशिवरात्री उत्सवानिमित्त जागृत पुरातन महादेव देवस्थान या ठिकाणी दिंडी सोहळ्याचे आयोजन तसेच   अनेक वर्षापासून गोरगरिबांचे लहान मुले शिकावेत यासाठी स्वतःचे घर अंगणवाडीसाठी दिले होते, मुलींना स्वसंरक्षणासाठी कराटे क्लासेस तसेच स्पर्धेचे आयोजन केले आहे. शासकीय योजनांची माहिती,विधवा, निराधार, गरजू, वयोवृद्ध नागरीकांना देऊन लाभ मिळवून दिला असंघटित बांधकाम कामगार यामधील कुशल - अकुशल महिला यांना मार्गदर्शन करत शासकिय मदत मिळवून दिली,श्रीरामपूर येथील दैनिक सार्वमत आयोजित महा एक्सपो खेळ पैठणीचा यामध्ये सहभाग घेत तृतीय क्रमांक प्राप्त करत वडाळा महादेव गावाचे नाव लौकिक केले. सौ. मीनाक्षी देसाई यांनी अनेक सामाजाभिमुख उपक्रम राबविले आहे या कार्याची दखल घेत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई यांच्या वतीने दखल घेत त्यांना नारीशक्ती पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
पुरस्काराचे वितरण श्री क्षेत्र सराला बेट मठाधिपती महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज तसेच आदर्श गाव हिवरे बाजार सरपंच पोपटराव पवार यांचे शुभ हस्ते शिर्डी या ठिकाणी वितरण होणार आहे, सदरचा कार्यक्रम महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे राज्य सचिव डॉ. विश्वासराव आरोटे यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डी या ठिकाणी संपन्न होणार आहे.या पुरस्काराबद्दल सौ.मीनाक्षी देसाई यांचे परिसरातून अभिनंदन होत आहे.

*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close