shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

धन कमावतांना प्रामाणिकपणे कमवा - हभप उत्तम महाराज गाडे


*माळवाडगाव/प्रतिनिधी
माणसाने धन जरूर कमवा मात्र ते कामावतांना वाईट मार्गाने न कमावता प्रामाणिकपणे कमवा चांगल्या मार्गाने कमावलेले धन सुख समाधान देते असे विचार श्रीक्षेत्र मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबा येथील हभप उत्तम महाराज गाढे यांनी माळवाडगाव येथे आयोजित प्रवचनातून भविकांसमोर व्यक्त केले.

           भगवंताचे भजन चिंतन करा भगवंताचे नामस्मरण करा आपले जीवन जगत असताना चांगले जीवन जगावे. दाढी वाढवून कोणी छत्रपती शिवाजी महाराज होऊ शकत नाही त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचार जीवन चरित्र आत्मसात करावे. प्रत्येकाने जीवन जगत असताना नीतीने वागावे अनितीने वागल्यास जीवन सार्थकी लागत नाही. आपल्याला व आपल्या कुटुंबाला सुख समाधान मिळवायचे असेल तर परमार्थिक धन निश्चित कमवा. प्रत्येकाने जीवन जगत असताना आपल्या आई वडिलांची सेवा करावी. आपल्या मुलांवर सर्वात जास्त प्रेम करणारे या जगात फक्त आई-वडीलच असतात. आई मायेचा सागर तर बाप प्रेमाची फुंकर असते. माणसाने जीवन जगत असताना साधू संतांची सेवा करावी. या जगात आई-वडिलांची सेवा सर्वश्रेष्ठ सेवा असल्याचे प्रतिपादन श्रीक्षेत्र मुक्ताई ज्ञानपीठ पुणतांबा येथील महंत ह भ प उत्तम महाराज गाडे यांनी यावेळी प्रवचनातून उपस्थितांसमोर केले. कार्यक्रमाचे आयोजन किसन फकीरा आसने यांनी केले होते तर महाराजांचे संत पूजन अरुण आसने यांनी केले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब चिडे, बाजार समितीचे संचालक गिरीधर आसने, सुदामराव आसने, बाजीराव आसने, उत्तमराव आसने, नानासाहेब आसने, रावसाहेब काळे, बाळासाहेब हुरुळे, दिलीपराव हुरुळे, किसनराव आसने, श्रीधर आसने, बबन गणपतराव आसने, अण्णासाहेब आसने, संजय आसने, लक्ष्मण चिडे, महेश आसने, प्रदीप आसने, पिंटू अनुसे, निलेश आसने, लक्ष्मण आसने, सतीश आसने, पत्रकार संदीप आसने, मच्छिंद्र गाढे, रवींद्र शिंदे, सोमनाथ बोर्डे, संतोष आसने, अरुण आसने, भाऊसाहेब आसने, गणेश आसने आदी ग्रामस्थ मान्यवर उपस्थित होते.

*पत्रकार संदिप आसने - माळवडगांव
*संकलन:
समता न्यूज -  नेटवर्क श्रीरामपूर
close