shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अशोक कारखान्याची भरभराट बघून बेलापूरचे व्यापारी भारावले


श्रीरामपूर प्रतिनिधी:
अशोक कारखाना ही तालुक्याची कामधेनू असून श्रीरामपूर तालुक्यातील बाजारपेठा या कामधेनूवर अवलंबून आहेत. माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करुन नविन प्रक्रल्पांची भर घालून अशोक कारखान्याचे उद्योग समुहात रुपांतर केले. अशोक कारखान्याची भरभराट बघून आम्ही व्यापारी भारावून गेलो आहोत, असे गौरवोदगार बेलापूर मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष प्रशांत लढ्ढा, किराणा असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण व सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष अरुण मुंडलिक यांनी काढले.


               बेलापूर मर्चट असोसिएशन, किराणा मर्चट असोसिएशन आणि सुवर्णकार संघटनेच्या वतीने अशोक सहकारी साखर कारखाना येथे सहकुटुंब सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीचा जवळपास ५० व्यापारी, महिला, युवा, बालगोपाल यांनी मनसोक्त आनंद घेतला. ऊसापासून रस बनविणे, साखर उत्पादन, अल्कोहोल निर्मिती, इथेनॉल निर्मिती आणि वीज निर्मिती या सर्व विभागांची माहिती देण्याची व्यवस्था कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर कारखान्याचे भास्करराव गलांडे पाटील सभागृहात मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे, कारखान्याचे संचालक हिम्मतराव धुमाळ, संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे, माजी संचालक राधाकिसन उंडे, कारेगाव भाग कंपनीचे संचालक नारायण बडाख यांचे उपस्थितीत बेलापूर मर्चट असोसिएशन, किराणा मर्चट असोसिएशन आणि सुवर्णकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
             याप्रसंगी मुळा प्रवरा वीज संस्थेचे संचालक सिद्धार्थ मुरकुटे व संचालक हिम्मतराव धुमाळ यांनी अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेले प्रकल्प यांची माहिती देऊन त्याचा श्रीरामपूर व बेलापूर बाजारपेठेला होत असलेला फायदा याची माहिती दिली. तसेच अशोक कारखान्याने परिसरातील मुला-मुलींसाठी नविन शैक्षणिक संकुलांची उभारणी केली असून त्यामध्ये शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी नामांकीत कंपन्यांमध्ये तसेच सरकारी सेवेत रुजू झाले असल्याची माहिती संचालिका सौ.मंजुश्रीताई मुरकुटे यांनी दिली.
           यावेळी किराणा मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण, सुवर्णकार संघटनेचे अनिल मुंडलीक, जनसेवा पतसंस्थेचे चेअरमन प्रविण लुक्कड आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी कार्यालय अधिक्षक विक्रांत भागवत यांनी उपस्थित व्यापारी बंधू भगीनींचे स्वागत केले. तर युवा उद्योजक अमित लुक्कड यांनी प्रास्ताविक केले.
            यावेळी पंकज हिरण, केदारनाथ मंत्री, विकी मुथ्था, महेश मंत्री, आनंद लुक्कड, प्रविण राका, बेलापूर मर्चंटच्या संचालिका सरोज हरकुट, सुषमा लुक्कड, मोनाली लुक्कड, सोनाली लुक्कड, रश्मी लुक्कड, सुषमा लुक्कड, सुनंदा चांडक, अक्षरा मुंदडा, गौरी मंत्री, दिव्या मंत्री, राखी हिरण, ज्येष्ठ महिला श्रीमती सुलोचनाबाई लखोटीया, श्रीमती चंद्रकला हिरण, स्वाती राका, निकिता लुक्कड, रेणुका मुंडलीक, कविता मुथ्था, गिता मुथ्था, शिल्पा लखोटीया, सुवर्णा चोरडीया, मोहिनी दायमा, पूर्वा मुथ्था, जयेश लड्डा, यश बिहाणी, अनुज लुक्कड आदी उपस्थित होते. सहल यशस्वी करणेकरीता गणेश लड्डा, शांतीलाल हिरण, प्रशांत लड्डा, अनिल मुंडलीक यांनी विशेष प्रयत्न केले.

*पत्रकार राजु मिर्जा
 ब्युरो चीफ: नाशिक विभाग 
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close