shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना मित्र पक्ष पदाधिकारी यांची धमकी. हर्षवर्धन पाटील यांचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र.

भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांना मित्र पक्ष पदाधिकारी यांची धमकी. हर्षवर्धन पाटील यांचे उपमुख्यमंत्री व  गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र.
 इंदापूर : इंदापूर तालुक्यातील भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांस दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचे सरकार आपल्या मार्गदर्शनाखाली योग्य पद्धतीने कामकाज करीत आहे. परंतु माझ्या तालुक्यामध्ये मी आपल्या नेतृत्वाखाली राजकीय व सामाजिक जीवनात काम करत असताना इंदापूर मधील मित्र पक्षांचे काही पदाधिकारी राजकीय जाहीर मेळावे व सभा मधून माझे वरती अतिशय खालच्या पातळीवर, एकेरी व शिवराळ भाषेत बेताल वक्तव्य करीत आहेत. त्याचबरोबर तालुक्यामध्ये फिरू न देण्याची धमकी देत आहेत. त्यामुळे मला माझ्या सुरक्षितेची चिंता वाटत आहे. सदरील बाब अतिशय गंभीर असून आपण यामध्ये तत्काळ लक्ष घालावे. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच आळा घालणे आवश्यक आहे. तरी आपण याबाबत ठोस भूमिका घेऊन योग्य त्या कारवाईचे आदेश देऊन सहकार्य करावे असे पत्र हर्षवर्धन पाटील यांनी आपल्या सहीनिशी दिले आहे. त्यामुळे सदर पत्राचा विचार  केला जाईल का?  याच पत्रामुळे इंदापूर तालुक्यात युती धर्माचे काय होणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
close