shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

प्राईड ॲकेडमीने चांगले दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे; आम्ही देखील मदती साठी सदैव तप्तर - युवा नेते उदयन गडाख


*भविष्यात दर्जेदार शिक्षण देणाऱ्या*
*संस्था टिकणार - आ. लहुजी कानडे*

श्रीरामपूर प्रतिनिधी:
प्राईड ॲकेडमीने चांगले दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे, त्यासाठी आम्ही देखील मदतीसाठी सदैव तप्तर असल्याचे युवा नेते उदयन गडाख पाटील यांनी यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले.

नेवासा तालुक्यातील पश्चिमेला तसेच राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील मुळाथडी परीसरातील पानेगांव येथे प्राईड ॲकेडमी व उमेद फाऊंडेशन संयुक्त इंग्लिश स्कूल, ज्युनिअर कॉलेज तृतीय शाखेचा नुकताच शुभारंभ करण्यात आला, याप्रसंगी मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष युवा नेते उदयन गडाख हे आपल्या भाषणात बोलतं होते. अध्यक्षस्थानी श्रीरामपूरचे आमदार लहूजी कानडे हे होते. यावेळी ह.भ.प.बाळकृष्ण महाराज, साई संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर ,मुळाचे कारखाना चेअरमन नानासाहेब तुवर, काँग्रेस तालुकाध्यक्ष अरुण पाटील नाईक, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, संचालक संजय जंगले , माजी सभापती डॉ .वंदना मुरकुटे, उमेदचे प्रा.बी.वाय वाघ , क्षितिजदादा मुरकुटे, कोंडाजी विटनोर आदी उपस्थित होते. प्रारंभी चिमुकल्या विद्यार्ध्यांनी भगवत गीतेच्या पठण करून कार्यक्रमाची सुरवात केली.

आपल्या भाषणात गडाख यांनी सांगितले की, पुढची दुरदृष्टी ठेवून ज्येष्ठ नेते साहित्यिक माजी खा. यशवंतराव गडाख पाटील यांनी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात तसेच शिक्षणाबरोबरच कारखानदारी पाया भक्कम केला.आमदार शंकरराव गडाख पाटील हे गडाख साहेबांच्या मागदर्शनाखाली जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळवून देत आहे.विविध विकास कामं मार्गी लागत आहे. मुळाथडी परीसर हा बागायती जरी असला तरी येथे शिक्षणाचा सुविधा उपलब्ध नाही, दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी सोनई ,राहुरी, अहमदनगर, श्रीरामपूर ,नेवासा आदि ठिकाणी विद्यार्थींना जावे लागते, हिच सुविधा प्राईड ॲकेडमीने क्वालिटी दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून द्यावे, आम्हीही मदतीसाठी तप्तर आहोच. त्याचबरोबर येथील दहा ते बारा गांव डॉ.वंदनाताई तुमच्या बरोबर राहतील असा विश्वास गडाख यांनी व्यक्त केला. 

आमदार लहूजी कानडे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, सध्या शिक्षण क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली असून ग्रामीण भागात प्राईड ॲकेडमीने गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घ्यावे भविष्यात नव नवीन उपक्रम राबवून नाव लौकीक निश्चितच वाढणार असल्याचे सांगितले.स्पर्धेच्या युगात भविष्यात चांगल्या दर्जेदार ,गुणवत्तापूर्ण व आधुनिक  शिक्षण देणाऱ्या संस्था टिकणार आहेत त्यात प्राईड नक्कीच यशस्वी होईल याची मला खात्री आहे असेही ते म्हणाले.

प्राईड ॲकेडमीच्या संस्थापिका तथा पं .स.माजी सभापती  डॉ. वंदना मुरकुटे यांनी सांगितले की, भेर्डापूर येथे जंजिरे पाटील यांच्या  कांदा चाळीच्या शेड मध्ये दहा वर्षांपूर्वी सुरु केलेली संस्था आज शैक्षणिक गुणवत्ता दर्जेदार शिक्षण, डिजिटल सुविधामुळे विद्यार्थ्यांमध्ये आमूलाग्र बदल घडवून आला, भेर्डापूर - वांगी येथे ७५० विद्यार्थी इंग्लिश स्कूल तसेच ज्युनिअर कॉलेज शिक्षण घेत असून मुळाथडी परीसरात प्राईड अँकेडमी नक्कीच थोरा- मोठ्यांच्या आशिर्वादाने भरारी घेईल असा विश्वास डॉ.मुरकुटे यांनी व्यक्त केला.

सचिन गुजर यांनी आपल्या मनोगता मध्ये सांगितले की,ज्या पद्धतीने मंदिर तसेच धार्मिक कामात तनमनधनाने योगदान दिले जाते त्याच पद्धतीने आपण शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी लक्ष देवून मंदिराच्या रुपाने शाळा शैक्षणिक धोरण गरजेचं असल्याचं सांगितले.कार्यक्रमासाठी पांडुरंग घावटे, अशोक भोसले विराज भोसले , भरत साळुंखे, राजेंद्र कोकणे, शांताराम तुवर,मुळाचे संचालक संजय जंगले, रंगनाथ जंगले, दत्तात्रय घोलप, भगिरथ जाधव, कुशाराम जाधव, विजय जाधव, सतिश फुलसौंदर, संजय कंक, विलास धामणे, जालिंदर जंंगले, अप्पासाहेब जाधव यमाजी जाधव काकासाहेब जाधव, काशिनाथ आयनर,तुषार विटनोर, कोंडाजी विटनोर, अनिल बिडे, संजय पवार,अर्जुन राऊत , बंडोपंत बोडखे पत्रकार संघटनेचे बाळासाहेब नवगिरे,अविनाश जाधव, सुहास टेमक, सुर्यकांत टेमक, रमेश जंगले, कैलास जाधव, रमेश गुडधे, अप्पासाहेब काळे शरद कोलते.डॉ.गुडधे, सुरज जंगले,दीपक बडाख, नाथाभाऊ कोलते ,भाऊसाहेब पारखे,अरुण कवडे,गणेश कवडे .राहुल बनकर,डॉ.संजय तुवर,संतोष पवार ,भाऊसाहे रोडे, रंजन जाधव ,गोरख जाधव,गोरख  तारडे,सुनील भराडी आदींसह मान्यवर उपस्थित होते. 
प्रास्ताविक उमेद फाऊंडेशन चे प्रा .बी वाय वाघ यांनी केले.

सुत्रसंचलन प्रा.दादासाहेब जाधव यांनी तर आभार ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी मानले.

*पत्रकार अमोल शिरसाठ - श्रीरामपूर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - *9561174111*
close