आमदार दत्तात्रय भरणे यांनी केला नोटरीपदी नेमणूक झालेल्या वकिलांचा सत्कार.
इंदापूर: इंदापूर तालुक्यातील भारत सरकार नोटरीपदी नेमणूक झालेल्या २४ वकिलांचा आमदार दत्तात्रय भरणे यांनी सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नोटरीपदी नियुक्ती झालेले अॅड. माधव शितोळे, दिलीप गिरमे, समीर टिळेकर, प्रमोद खरात, शिवाजी नगरे,प्रशांत कुचेकर, संदीप शेंडे, रवींद्र कोकरे, सचिन राऊत, श्रीकांत करे, अवधूत डोंगरे, अनिल व्यवहारे, विनोद पाटेकर, दीपाली माळवदे, रूपाली माळवदे, महेंद्र लोंढे, जमीर मुलाणी, धैर्यशील नलवडे, अनिल पाटेकर, तेजल वीर, अविनाश झणझणे, बापूराव शिंगाडे यांचा सत्कार करण्यात आला.
तालुक्याच्या खेडोपाड्यातील
वकिलांना नोटरीपदी काम करण्याची संधी मिळाल्याने यापुढील काळात सर्वसामान्य नागरिकांना आपापल्या गावातच विविध दस्तऐवज नोंदवून
नागरिकांची सोय होणार असल्याने आपणास आनंद होत असल्याचेही त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन अॅड. लक्ष्मणराव शिंगाडे यांनी केले, तर अॅड. किरण धापटे यांनी आभार