shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जय हिंद अकॅडमीचे पोलीस भरती शिबिर उत्साहात संपन्न



श्रीरामपूर प्रतिनिधी:
शहरातील नेवासा रोड, औद्योगिक वसाहत येथील जय हिंद अकॅडमी मध्ये मोफत पोलीस भरती मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते. 
त्याप्रसंगी जय हिंद अकॅडमीचे संचालक सुयोग सस्कर यांनी भरती संदर्भातील वयोमर्यादा, पोलीस भरतीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांची पूर्तता तसेच अभ्यासासाठी लागणारी पुस्तके याबद्दल मार्गदर्शन केले.तसेच जय हिंद चे संचालक अजय बत्तीसे यांनी विद्यार्थ्यांना विषयानुरूप मार्गदर्शन केले. 

या वेळी शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थी- विद्यार्थिनी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी गोळा फेक, शंभर मीटर मैदानाचे श्रीफळ वाढवून उद्घाटन जय हिंद चे सदस्य सुहास गोरे , पो. कॉ.प्रशांत बारसे यांच्या हस्ते करण्यात आले.             
        आलेल्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना गोळा फेक, शंभर मीटर व सोळाशे मीटर प्रात्यक्षिके दाखवण्यात आली .यावेळी जय हिंद चे विद्यार्थी ओमकार सिन्नरकर, विशाल गोलवड ,महेश भालेराव, सोमनाथ पवार विद्यार्थिनी भाग्यश्री पवार ,जयश्री धनवटे ,  ईश्वरी पवार यांनी प्रात्यक्षिके दाखवली. त्याच प्रमाणे आलेल्या विद्यार्थ्यांनी देखील प्रात्यक्षिके करून दाखवली.

     कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय हिंद च्या संचालिका उर्मिला सस्कर तसेच विद्यार्थी ऋषिकेश बारसे ,अजय शिंदे ,प्रशांत बहिरे, हनान शेख, कृष्णा पवार, अभिजीत रणवरे ,रोहन गायकवाड, रितेश जाधव, संकेत सलालकर, विशाल गवळी यांनी योगदान दिले.

*पत्रकार अफजल मेमन,श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close