*मार्च महिन्याचे निवृत्तीवेतन १० एप्रिलपर्यंत खात्यात जमा होणार - जिल्हा कोषागर अधिकारी श्रीमती भाग्यश्री जाधव-भोसले
अहमदनगर जि.मा.का.वृत्तसेवा:
अहमदनगर कोषागारांतर्गत निवृत्तीवेतन घेणा-या सर्व राज्यशासकीय निवृत्तीवेतन,कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना या पुढे शासनाच्या ई-कुबेर प्रणालीमार्फत भारतीय रिझर्व बँकेतून थेट निवृत्तीवेतन धारकांच्या खात्यात जमा होणार आहे. तसेच जिल्हयातील सर्व निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांचे माहे मार्च महिन्याचे मासिक निवृत्तीवेतन हे १० एप्रिल पर्यंत जमा असल्याची माहिती जिल्हा कोषागर अधिकारी श्रीमती भाग्यश्री जाधव-भोसले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
निवृत्तीवेतन जमा करण्यासाठी निवृत्तीवेतनधारकांनी जी बँक घेतली असेल त्याच खात्यातील आयएफसी कोड नुसार ही निवृत्तीवेतन जमा होईल. जर काही निवृत्तीवेतनधारकांनी हया कोषागार कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर बँक खाते,शाखा अहमदनगर व्यतिरिक्त इतर जिल्ह्यात तसेच इतर बँकेत बदल करुन घेतले असेल, तर अशा निवृत्तीवेतन धारकांचे निवृत्तीवेतन जमा होण्यास अडचणी निर्माण होतील.
ज्या निवृत्तीवेतन धारकांनी परस्पर बँक, शाखा व बँक खात्यात बदल करुन घेतले असतील, अशा निवृत्तीवेतनधारकांची भविष्यात पेन्शन बाबत अडचणी निर्माण झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी त्यांचीच राहील, असेही प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
*पत्रकार रमेश जेठे सर अहमदनगर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111