shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

योगेश भागवतकर यांचा संत रविदास युवा रत्न महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मान


अहमदनगर प्रतिनिधी:
मराठी भाषा गौरव दिन,महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळ ( लीडकॉम ) सुवर्ण महोत्सव,संत रविदास महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने सकल चर्मकार समाज महाराष्ट्र राज्य , सम्राट अशोक विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि संत रविदास महाराज सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने चर्मकार समाजातील प्रमुख संघटना संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार,समाज विभूषण पुरस्कार ,संत रविदास समाज रत्न पुरस्कार ,संत रविदास युवा समाज भूषण पुरस्कार देण्यात आला. सदर राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा २७ फेब्रुवारी रोजी अहमदनगर येथे पार पडला.

संत रविदास युवा समाजभूषण पुरस्कारसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून २० पुरस्कार कर्त्यांची निवड करण्यात आली. अकोला जिल्ह्यातील माना ता.मुर्तिजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते योगेश भागवतकर यांना संत रविदास युवा समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. योगेश भागवतकर यांनी महाराष्ट्रातील विविध संस्था, सामाजिक संघटना बरोबर काम करून समाजाला न्याय देण्यासाठी कार्य केले. चर्मकार समाजातील युवकांना शैक्षणिक व राजकीय मार्गदर्शन करणे, युवकांना महाराष्ट्रात रोजगार उपलब्ध करून देणे, व्यवसायिक मार्गदर्शन करणे, चर्मकार समाजातील युवकांना सोबत घेऊन जनजागृती करणे ,चर्मकार समाजातील गरीब बांधवांची मदत करणे इत्यादी समाजसेवेची दखल घेण्यात आली. पुरस्कार वितरण सोहळा मध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते आणि समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सत्यम गाडे सी.आय.डी अधिकारी, मा.सूर्यकांत गवळी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र,मा.अभय आगरकर भाजप शहर जिल्हाध्यक्ष ,मा. अशोक विजयकर चेअरमन लीडकॉम, मा.अशोक कानडे नगरसेवक, मा.गोविंदराव खटावकर जेष्ठ नेते, मा.प्रकाश पिंपळे उद्योजक,मा. उदय देवकर आर एम लिडकॉम, मा.बालाजी सोनटक्के पोलीस आयुक्त,मा. भाऊलाल निंभोरे पीडब्ल्यूडी अभियंता,मा. दिनेश देवरे, मा. रामदास बिरभाऊ, चर्मकार संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष मा.शिवाजी साळवे, सोशल मीडिया महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख मा.गोकुळदास साळवे मा. मीराताई शिंदे,मा.अमरजी तांडेकर,मा.राजेंद्रजी तांबेकर, आयोजक मा. विजय घासे, मा. नितीनजी भटकर इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते युवा रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
योगेश भागवतकर यांच्या या युवारत्न सन्मानाबद्दल विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून समाज माध्यमातूनही त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


*पत्रकार सौ.सुनंदाताई शेंडे - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close