shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

बावडा येथे कृषी मित्रांकडून माती परीक्षण बद्दल मार्गदर्शन.*

*बावडा येथे कृषी मित्रांकडून माती परीक्षण बद्दल मार्गदर्शन.* 
इंदापूर: महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत रत्नाई कृषी महाविद्यालय अकलूज यांच्या वतीने ग्रामीण जागरूकता कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत शेतकऱ्यांना माती परीक्षण व त्याचे महत्त्व याबद्दल माहिती देण्यात आली.
 माहितीअकलूज येथील शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. संग्राम सिंह मोहिते पाटील रत्नाई कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य मा. आर .जी. नलावडे प्रा. एस .एम .एकतपुरे ( कार्यक्रम समन्वयक),  प्रा.एम .एम .चंदनकर (कार्यक्रम अधिकारी) प्रा. सौ एच .व्ही .कल्याणी (कार्यक्रम अधिकारी )प्रा. एस. आर .आडत यांच्या मार्गदर्शनानुसार कृषीदुत जयश शिंदे, विश्वजीत आदमाने, श्रेयस कुलकर्णी, आकाश माने, मेघराज पाडूळे, आदित्य कवळसकर, नवनाथ इरकर यांनी उपस्थितांना माती परीक्षण कसे करावे व याचे शेतीमधील महत्व पटवून दिले. तसेच मातीमधील मूलद्रव्य व त्याचे पिकांच्या वाढीत असणारे महत्त्व पटवून दिले.
 *शेतकऱ्यांचा प्रतिसाद:-* 
कृषी मित्रांनी दिलेल्या माहितीमुळे शेतकऱ्यांना मातीमधील मूलद्रव्यांचे महत्त्व पटले. तसेच शेतकऱ्यांनी विद्यार्थ्यांना आश्वासन दिले की माती परीक्षण करूनच खतांचा वापर योग्य पद्धतीने करतील.
close