श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यातील बेलापूर येथील बेलापूर एज्युकेशन सोसायटीच्या कला व वाणिज्य महाविद्यालयात विद्यार्थींनींसाठी मोफत कराटे प्रशिक्षण घेतले जात आहे. ही या महाविद्यालयाची बेस्ट प्रॅक्टिस आहे.
उच्च शिक्षण क्षेत्रात मुलींचे प्रमाण कमी आहे. सक्षमीकरण अजून खूप बाकी आहे.विद्यार्थिनी अधिकाधिक निर्भय होण्यासाठी कराटे प्रशिक्षणाचा उपक्रम महाविद्यालयाने हाती घेतला. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रशिक्षण घेतले जाते, त्यासाठी प्रशिक्षण तज्ज्ञ म्हणून अकबर शेख काम करतात. मुलींना निर्भय करण्याचे अनेक धडे ते देत असतात. दररोज सराव घेतले जातात आणि डेमो दाखविले जातात.मुलींना निर्भय बनविणे या हेतूनेच हा उपक्रम अतिशय यशस्वी बनला आहे. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, कराटे प्रशिक्षण समन्वयक डॉ.व्ही.एन.काळे , अकबर शेख आदींनी प्रशिक्षण पूर्ण करणा-या विद्यार्थिनींचे अभिनंदन करुन मार्गदर्शन केले. सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी विद्यार्थीनी यांनी परिश्रम घेतले.
*पत्रकार अमन सय्यद - बेलापूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111