श्रीरामपूर प्रतिनिधी:
भारत सरकार च्या विधि व न्याय मंत्रालयाच्या वतीने नोटरी पब्लिक पदासाठी अर्ज मागविण्यात आले होते त्याद्वारे मुलाखत होऊन श्रीरामपुर जिल्हा व सत्र न्यायालयात गेल्या १४ वर्षांपासुन वकीली करणारे श्रीरामपुर वकील संघाचे माजी उपाध्यक्ष एडवोकेट समीन बागवान यांची निवड करण्यात आली आहे.
श्री. बागवान यांनी वकील व्यवसाय करताना विधि सेवा समिति,मोफत सल्ला मार्गदर्शन केंद्र, कायदेविषयक शिबिरे याद्वारे कायम सामाजिक भान ठेऊन गोर गरीब,दिन दुबळे, शेतमजूर व असंख्य अन्याय पीड़ितांना न्याय मिळवून दिलेला असून या कामी ते सदैव जनते च्या सेवेकरीता तत्पर असतात.
त्यांच्या या नोटरी पदी झालेल्या निवडीबद्दल विधी क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव यासोबतच अभिनंदन केले जात आहे.
पत्रकार राजु मिर्जा
ब्युरो चीफ: नाशिक विभाग
स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111