shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जप्त केलेल्या वाहनांचा ५ मार्च रोजी लिलाव


अहमदनगर जिमाका वृत्तसेवा: 
राहुरी तालुक्यातील चाळुचोरी विरोधी पथकांनी मुळा,प्रवरा नदीपात्रातुन अवैधरित्या गौणखनिजाचे उत्खनन करुन वाहतुक करत असताना जप्त केलेल्या वाहन मालकाविरुद्ध दंडात्मक कार्यवाहीचे आदेश पारीत केले आहेत. वाहन मालकांनी दंडात्मक रक्कम शासन जमा न केल्याने अशा वाहनांचा लिलाव ५ मार्च २०२४ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसिल कार्यालय, राहुरी येथे करण्यात येणार आहे. 

जप्त केलेल्या वाहनांच्या विक्रीसाठी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी वाहनमालकांनी दंडाची रक्कम शासन जमा करावी. अन्यथा जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. तसेच लिलावाच्या अटी व शर्तीसाठी तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा असे तहसिलदार, राहुरी यांनी कळविले आहे.
(संग्रहित छायाचित्र)

*जावेदभाई शेख - राहुरी
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर -  9561174111
close