shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

समाजात कामामुळे सर्वात जास्त सन्मान व आदर शिक्षकांना मिळतो - सचिन खुडे गटविकासअधिकारी.

समाजात कामामुळे सर्वात जास्त सन्मान व आदर शिक्षकांना मिळतो - सचिन खुडे 

जुनी पेन्शन संघटनेने घेतलेला पुरस्कार सोहळा कौतुकास्पद - अजिंक्य खरात गटशिक्षणाधिकारी.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन 26 महिला शिक्षिकांना गुणवंत पेन्शन योद्धा पुरस्कार देवून सन्मान..

इंदापूर: दि 16 महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना इंदापूर शाखेच्या वतीने लोकनेते शंकररावजी पाटील सभागृह इंदापूर येथे गुणवंत पेन्शन योद्धा पुरस्कार वितरण , जुनी व नवीन कार्यकारणी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पुजन नुतन गटविकास अधिकारी सचिन खुडे , गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात , सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी पोपट काळे , विस्तार अधिकारी सुनिल मुगळे , रूईकर साहेब , केंद्र प्रमुख संभाजी आजबे , मारूती सुपुते , शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष सुनिल वाघ , ज्ञानदेव बागल , प्रकाश तोबरे , सहदेव काळेल यांचे हस्ते करून पुरस्कार वितरण कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.
       *गटविकास अधिकारी खुडे यांनी सांगितले* आपले काम आनंदाने व तळमळीने केल्यास येणारी आपली पिढी चांगली होईल. अनेक प्रसंग सांगून शिक्षकांचे इतका सन्मान पृथ्वीवर कोणाला मिळत नसल्याचे सांगितले. *गटशिक्षणाधिकारी अजिंक्य खरात* यांनी बोलताना जुनी पेन्शन संघटनेचे उपक्रमाचे कौतुक केले. संघटनेचे माध्यमातून विविध कामे पूर्ण केली जातात असे सांगितले. *सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी पी एस काळे* यांनी इंदापूर तालुक्यांमध्ये काम करताना आलेले अनुभव , आठवणी व्यक्त केल्या. यावेळी ज्ञानदेव बागल , जयश्री धाईंजे , विजय पाटील यांनी मनोगते व्यक्त केली.
       इंदापूर तालुक्यांमधील 26 *केंद्रातील 26 महिला शिक्षिका यांना गुणवंत पेन्शन योद्धा पुरस्कार* व *सुनिल धुरूपे व सौ सुजाता धुरुपे* या शिक्षक दांपत्य यांना आदर्श शिक्षक दांपत्य पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला. *संतोष हेगडे यांना आदर्श शिक्षक नेतृत्व* सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
          नुतन कार्यकारिणी अध्यक्ष निलिमा भोंग , उपाध्यक्ष मनोहर जाधव , सरचिटणीस सागर भोसले , कार्याध्यक्ष सुनिल पवार , कोषाध्यक्ष निलेश शिंदे , संघटक सागर रणसिंग , अभिजीत मखरे , राजकुमार तरंगे , बालाजी राठोड , सचिन लोंढे , नितीन कदम  यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नुतन अध्यक्ष निलिमा भोंग यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संजय भोंग , प्रताप शिरसट , भारत ननवरे , सोमनाथ शिंदे , रविंद्र लोखंडे , विनय मखरे , सचिन कोळी , विकास वाघ , संदिप पवार , हनुमंत खुळे , समाधान भोंग , राहुल बनसुडे , राहुल ढुके , किरण घाडगे , राहुल कानगुडे , समीर मुलाणी ,  यांनी सहकार्य केले. यावेळी नितीन वाघमोडे ,सुनिल शिंदे , अरुण मीरगणे , प्रविण शेंडे , विकास भोंग ,सचिन  गायकवाड , नाना पवार , संदिप जाधव , रामचंद्र कांबळे , तुकाराम भोसले , संतोष साबळे , सचिन गुरव , सतेश भोंग , संभाजी सूर्यवंशी , संतोष चोरमले , सोपान औताडे , गणेश सोलनकर , अरूण कांबळे , दिपक सूर्यवंशी , शशिकांत कावळे , प्रविण कुपकर , शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष हेगडे यांनी केले. आभार सागर भोसले यांनी मानले.
close