shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

नामदार विखे पाटील यांच्या प्रयत्नाने बेलापूर बु ! ग्रामपंचातीला शासनाकडून ४३ एकर जमिन सार्वजनिक उपयोगासाठी विनामूल्य प्रदान- ग्रामस्थांनी साजरा केला आनंदोत्सव


बेलापुर प्रतिनिधी:
महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी बेलापुरच्या विकासासाठी शेती महामंडळाची ३४ एकर जमीन दिल्यामुळे गावाच्या अनेक समस्या सुटणार असुन सबका साथ सबका विकास करण्यासाठी सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे असे अवाहन जि प सदस्य शरद नवले यांनी केले. 
बेलापूर बु ! ग्रामपंचायतीस १२०० नागरिकांची घरकुले,हिंदू स्मशानभूमी, मुस्लिम कब्रस्थान, आदिवासी समाज दफनभूमी, घनकचरा व्यवस्थापन,आदि सार्वजनिक प्रयोजनासाठी ३४ एकर शेती महामंडळाची जमिन  विनामूल्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला तसेच पाणीपुरवठा तळ्यासाठी या आधी साडे आठ एकर जमीन देण्यात आली आहे.महसुल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेती महामंडळाची एकूण ४३ एकर जमीन दिल्याबद्दल बेलापुर ग्रामस्थांच्या वतीने पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला,

 ग्रामस्थांच्या वतीने ढोल ताशांच्या गजरात जि. प. सदस्य शरद नवले, बाजार समितीचे उपसभापती अभिषेक खंडागळे यांची शोभायात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार तसेच शनि महाराजांचे दर्शन घेवुन ग्रामपंचायत कार्यालयासमोर भव्य असा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी फटाक्यांची अतिषबाजी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी टँक्सी असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनिल मुथा हे होते. या वेळी बोलताना शरद नवले म्हणाले की, मागील काळात आपण जिल्हा परिषदेत सौ. शालीनीताई विखे पा.यांना प्रामाणिकपणे मदत केली, त्या वेळी माझ्यावर विरोधकांनी वेगवेगळे आरोप केले, माझी बदनामी केली त्या वेळी प्रामाणिकपणे केलेल्या कामाची पावती आज आपल्याला कामाच्या रुपाने मिळत आहे. आगोदर १२६ कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना दिली नंतर साडेआठ एकर जमीन दिली, अन् आता ३४ एकर जमीन गावच्या विकासासाठी दिली त्यामुळे  आपणही आता विखे पाटील यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहुन भाजपाला मतदान करावे असे अवाहन नवले यांनी केले. या वेळी बोलताना बाजार समीतीचे उपसभापती अभिषेक खंडागळे म्हणाले की, बेलापूर च्या जनतेने मोठ्या विश्वासाने ग्रामपंचायतची सत्ता गावकरी मंडळाच्या ताब्यात दिली असून नामदार विखे पाटील व खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली भरीव विकास कामे सुरु आहेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन देविदास देसाई यांनी केले तर एकनाथ उर्फ लहानु नागले यांनी आभार मानले.
 या वेळी प्रफुल्ल डावरे, मोहसीन सय्यद,पुरुषोत्तम भराटे, किराणा असोसिएशनचे अध्यक्ष शांतीलाल हिरण,गोपी दाणी, लहानु नागले, हाजी इस्माईल शेख, विष्णूपंत डावरे आदिंनी मनोगत व्यक्त केले.
सर्वांनी आपल्या मनोगतात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजीत पवार,महसुल मंत्री व जिल्ह्याचे पालक मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांना धन्यवाद दिले तसेच जि.प. सदस्य शरद नवले व अभिषेक खंडागळे यांनी केलेल्या विशेष प्रयत्नाबद्दल त्यांचे आभार मानले. कार्यक्रमास सर्वश्री माजी सरपंच महेंद्र साळवी, सरपंच स्वाती आमोलीक,उपसरपंच मुस्ताक शेख, सौ. तबस्सुम बागवान, सौ प्रियंका कुऱ्हे, सुशिला पवार,चंद्रकांत नवले, ग्रामविकास अधीकारी मेघशाम गायकवाड, आजीज शेख,अरविंद साळवी, सुधाकर खंडागळे, प्रशांत लढ्ढा, प्रविण बाठीया, भाऊसाहेब कुताळ, बाळासाहेब दाणी, विशाल आंबेकर,दिलीप अमोलीक, पत्रकार दिलीप दायमा, सुहास शेलार, विजय अमोलीक,प्रभाकर कुऱ्हे, श्रीहरी बारहाते, राम सोनवणे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*पत्रकार देवीदास देसाई - बेलापूर*
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close