shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

स्वाती कासार यांना कर्तृत्ववान महिला पुरस्कार जाहीर*


संगमनेर प्रतिनीधी:
मातृसेवा फाउंडेशन ठाणे आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२४ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. आज जागतिक महिला दिनी निकाल जाहीर करण्यात आला.

स्वाती संपत कासार, नूतन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय राजापूर ता. संगमनेर यांना यंदाचा कर्तृत्ववान महिला पुरस्कार २०२४ जाहीर झाला आहे. 
त्यांनी शालेय विद्यार्थ्यांसाठी कला विषयांचे विविध उपक्रम व स्पर्धा राबविणे या विषयावर उपक्रम अहवाल सादर केला होता. महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे. त्यांचे कौतुक करून प्रोत्साहनासह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे.त्यांच्या उपक्रमाची माहिती राज्यातील सर्वांना व्हावी हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश होता. यातील विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र घरपोच पाठविण्यात येणार असून सर्व सहभागी महिलांना डिजिटल सन्मानपत्र देण्यात आले आहे.
यावर्षी राज्यभरातील एकूण ३० महिलांना या राज्यस्तरीय कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
 हा पुरस्कार मिळाल्यामुळे  प्रागतिक शिक्षण संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्यात गेला आहे. प्रागतिक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल गोडसे, उपाध्यक्ष आर.पी. हासे, सचिव कैलास हासे,भारत शेलकर  तसेच सर्व संचालक मंडळ,माजी प्राचार्य श्री. घोडेकर सर, जिजाबा  हासे सर, विद्यमान प्राचार्य श्री. खतोडे सर , पर्यवेक्षक श्री. पथवे सर, सर्व शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी आदींनी अभिनंदन केले आहे. त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल परिसरात सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

*पत्रकार लियाकतखान जी.पठाण - संगमनेर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close