shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भारत सरकार पब्लिक नोटरीपदी ऍडव्होकेट* *स्वाती गणेशराव गायकवाड यांची निवड


श्रीरामपूर प्रतिनिधी:
येथील खा.गोविंदराव आदिक ग्रामीण शिक्षण संस्थेचे माजी प्राचार्य सुभाष लिंगायत यांची कन्या ऍड. स्वाती गणेशराव गायकवाड (लिंगायत) यांची केंद्र सरकारच्या न्याय व विधी खात्याकडून नुकतीच पब्लिक नोटरीपदी निवड करण्यात आली आहे. पुणे येथे प्रथितयश विधिज्ञ म्हणुन त्यांचा लौकिक असुन कमी वयात हे यश संपादन करून त्यांनी पब्लिक नोटरीपदी निवड ही खुपच भुषणावह बाब आहे. विशेष म्हणजे त्यांचे माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल शिरसगांव व न्यू इंग्लिश स्कूल  उक्कलगांव याठिकाणी तर महाविद्यालयीन शिक्षण श्रीरामपूर येथील (आर.बी.एन.बी.) बोरावके महाविद्यालयात पूर्ण केल्यानंतर खा. गोविंदराव आदिक विधी महाविद्यालयात त्यांनी एलएलबी पदवी घेऊन डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून एल एल एम ची पदवी प्राप्त केलेली आहे.

त्यांच्या या नोटरीपदी निवडी बद्दल अतिथी काॅलनी येथील माजी प्राचार्य प्रकाश देशमुख ऍड. बाबासाहेब मुठे, विलास  कुलकर्णी, प्रदीप धुमाळ, दतात्रय रायपल्ली, पत्रकार बाबासाहेब चेडे, ज्येष्ठ नागरिक आनंद मेळाव्यचे अध्यक्ष लक्ष्मणराव निकम,प्रभाकर भोंगळे,श्रीरामपूर पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष  के. एल.खाडे, दामोदर जानराव,   के.पी. बोराडे,आंतरभारती डाॅ.प्रा. बाबुराव उपाध्ये, प्रा आदिनाथ जोशी,प्राचार्य टी. ई. शेळके, प्राचार्य शंकरराव अनारसे, लेविन भोसले आदी मान्यवरानी त्यांच्या निवडी बद्दल अभिनंदन करुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत, त्यांच्या या निवडीबद्दल सर्वच स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
सहयोगी  स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close