shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अशोक कारखाना येथे राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे आयोजन


श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यातील अशोकनगर येथील 
अशोकनगर कारखान्यात काम करताना कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक आरोग्य व  सुरक्षिततेच्या बाबतीत नेहमी जागरूक असले पाहिजे. कामात सुरक्षा साधनांचा वापर करून सतर्क राहिल्यास अपघात टाळता येतील. कामावर येताना व जाताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. स्वतःच्या शरीराची काळजी स्वतःच घेणे आवश्यक आहे. आपल्यावरच आपले कुटुंब अवलंबून आहे, याचे भान ठेवावे, असे प्रतिपादन कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी केले.
अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखालील अशोक कारखान्यात ४ मार्च ते ११ मार्च २०२४ या कालावधीत राष्ट्रीय सुरक्षितता सप्ताह निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी अधिकारी व कर्मचारी यांनी सुरक्षाविषयी शपथ घेतली.

             यावेळी  कार्यकारी संचालक संतोष देवकर म्हणाले की, राष्ट्रीय सुरक्षा दिवस आणि सुरक्षा सप्ताह मोहीम १९७१ पासून राष्ट्रीय परिषदेच्या स्थापना दिनानिमित्त आयोजित केली जाते. दरवर्षी ४ ते ११ मार्च अखेर राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे ते म्हणाले.
          यावेळी अशोक कामगार पतपेढीचे चेअरमन भाऊसाहेब दोंड, कार्यालय अधिक्षक विक्रांत भागवत, चीफ इंजिनिअर बाळासाहेब उंडे, चीफ केमिस्ट भगवान निकम, शेतकी अधिकारी नारायण चौधरी, चीफ अकाउंटंट मिलिंद कुलकर्णी, डेप्यु. चीफ इंजिनिअर सुनिल चोळके, डिस्टीलरी मॅनेजर बाळासाहेब हापसे, सिव्हिल इंजिनिअर कृष्णकांत सोनटक्के, इंजिनिअर दीपक नालकर, स्टोअर मॅनेजर ज्ञानेश्वर सांगळे, ऊस विकास अधिकारी विजयकुमार धुमाळ, लेबर ऑफिसर अण्णासाहेब वाकडे, सुरक्षा अधिकारी बाळासाहेब राऊत, गॅरेज इनचार्ज रमेश आढाव, सुरेंद्र हापसे, विलास लबडे, बाबासाहेब शेजुळ यांचेसह सुरक्षा विभागाचे व इतर विभागातील कर्मचारी उपस्थित होते.

*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close