shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी येथे मुलींच्या कबड्डी संघासाठीदिले ट्रॅक सूट भेट.

श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी येथे मुलींच्या कबड्डी संघासाठीदिले ट्रॅक सूट भेट.

इंदापूर : मंगळवार दि. ५ मार्च २०२४ रोजी श्रीमती हिराबाई हरिभाऊ देसाई विद्यालय बेलवाडी येथे इयत्ता ६वी या वर्गाच्या पालक विद्यार्थी व शिक्षक यांचा संयुक्त असा मेळावा सह विचार सभा सकाळी ठीक ९ वाजता पार पडली .सदर सभेमध्ये विद्यार्थी व पालक यांच्या अडचणी जाणून घेऊन साधक बादक अशी सर्व विषयावर चर्चा करण्यात आली. सदरील सभेमध्ये वर्गात प्रथम दुतीय तृतीय क्रमांक आलेल्या मुला मुली यांना सोमनाथ खैरे, अनिल कदम व बाळासो नगरे यांनी बक्षीस ठेवलेले देण्यात आले. तसेच श्री गणेश दूध डेरी बेलवाडी तर्फे श्री सोमनाथ खैरे यांनी रुपये १० हजार किमतीचे शाळेच्या मुलींच्या कबड्डी संघासाठी ट्रॅक सूट दिले.
 सदरील सभेला अनिल कदम ,सोमनाथ खैरे, बाळासो नगरे, डॉक्टर घोलप, सचिन पवार, ज्ञानदेव जाधव, जीवन पवार ,दीपक कदम ,शहिदा मुलानी, कांतीलाल जामदार ,सौ जामदार मॅडम, बाळासो पवार सर तसेच विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री निंबाळकर सर ,सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री बाळासो जामदार सर यांनी केले. तर वर्गाचा गुणवत्तेचा आढावा वर्ग शिक्षक श्री शेंडे सर व माने सर यांनी सांगितला व आभार  निंबाळकर मॅडम यांनी मांनले
close