shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

राज्यात वकील संरक्षण कायदा अंमलात आणला जावा..



*बार्शी वकील संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !!*

जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

आज दिनांक 12 मार्च 2024 रोजी वर्षा निवास स्थानी शिवसेना प्रवक्ते योगेश केदार आणि बार्शी वकील संघाचे एडवोकेट गणेश हांडे यानी मुख्यमंत्र्यांना Advocate protection Act अमलात यावा याबद्दल निवेदन दिले. काही महिन्यांपूर्वी नगर मधील राहुरी तालुक्यातील आढाव वकील दाम्पत्य यांची झालेली निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर राज्यभर आंदोलने झाली. सद्ध्या राज्यात पत्रकार संरक्षण कायदा तसेच डॉक्टर संरक्षण कायदा अस्तित्वात आहे. अगदी त्याच धर्तीवर वकिलांच्या देखील सुरक्षेच्या दृष्टीने कायदा करणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेत आपल्या सचिवांना योग्य त्या कार्यवाहीचा सूचना दिल्या. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की या संदर्भात विशेष वकिलांची टीम नेमून लवकरच सगळ्या अडचणीत सोडवण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. यावेळी Adv गणेश हांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महात्मा गांधी यांचे पुस्तक भेट देऊन आभार मानले.
close