shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

दिनांक ११ मार्च रोजी राज्यातील शेती महामंडळ कामगारांचा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा


 शिरसगांव प्रतिनिधी:
 शेती महामंडळाच्या लक्ष्मीवाडी या मळ्याची अंदाजे ५०० एकर जमीन विनामूल्य एमआयडीसी साठी शिर्डी येथे देण्यात आली आहे तसेच बेलवंडी मळ्याची ६०० एकर जमीन श्रीगोंदा एमआयडीसीसाठी दिली आहे साकुरी, निमगाव कणकुरी या ग्रामपंचायतला व शिर्डी नगरपरिषद यांना शंभर एकर जमीन विनामूल्य दिली गेली आहे.

एका बाजूला कामगारांच्या देय असलेल्या रकमा दिल्या जात नाही संयुक्त शेतीला दहा वर्षांपूर्वी जमिनी दिल्या गेल्या त्यामुळे ६००० रोजंदार कामगार बेकार झाले दुसऱ्या बाजूला कायदेशीर कामगारांच्या देय रकमा रु ९९ कोटी ५० लाख शेती महामंडळाकडे येणे असताना त्या दिल्या जात नाही आता विनामूल्य जमीन देण्यास सुरुवात झाली आहे जमीन धारणेची कमाल मर्यादा विधेयक यात सुधारणा केली २०२३ चे विधानसभा विधेयक क्रमांक ५२ याप्रमाणे कायदा संमत केला आहे सदर कायद्यात ५ किलोमीटरच्या परिसरात असलेल्या शैक्षणिक वैद्यकीय सार्वजनिक आरोग्य समाज कल्याण किंवा सांस्कृतिक प्रयोजनासाठी अन्य कोणत्याही सार्वजनिक प्रयोजनासाठी संबंधित ग्रामपंचायतीला वरील पूर्वीच्या कायद्यात बदल करून जमीन देण्याची दुरुस्ती केली आहे त्यामध्ये कामगारांना दोन गुंठे जागा देऊन घरे बांधून देण्यासाठी कायदा दुरुस्तीत कुठेही उल्लेख केला नाही हा कामगारांवर अन्याय आहे. उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालय यामध्ये प्रतिज्ञा दाखल करून कामगारांना २ गुंठे जागा देण्याचे व घर बांधून देण्याचे मान्य करण्यात आले होते व कामगारांना त्यांच्या देय रकमा देण्याची समितीने शिफारस केली होती  कामगारांना २ गुंठे जागा देऊन घरे बांधून देण्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी या सर्व मागण्यासाठी शेती महामंडळ कामगारांच्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी दि.११ मार्च रोजी दुपारी १२ वाजता अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय पिंपळगाव रोड शिर्डी येथे राज्यातील सर्व मळ्यावरील कामगारांचा मोर्चा आयोजित करून अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जाणार आहे.

 तरी राज्यातील सर्व मळ्यावरील कामगारांच्या भव्य प्रचंड मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन सुभाष कुलकर्णी, चांगदेव नगर, अविनाश आपटे श्रीरामपूर ज्ञानदेव आहेर लोणी, आनंदराव वायकर अहमदनगर, नितीन गुरसळ गौतमनगर, बाबासाहेब  बोरुडे गंगापूर, भिकन शिंदे रावळगाव, भालचंद्र शिंदे माळशिरस, वेणूनाथ बोळीज साकरवाडी, मनोहर शिंदे, सहजानंदनगर आदिनी केले आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्यांची एक यादी तयार करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले आहे .

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close