shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

वडाळा महादेव येथे महाशिवरात्री निमित्त विविध कार्यक्रम संपन्न

वडाळा महादेव प्रतिनिधी:
 श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील शिवकालीन  जागृत पुरातन महादेव मंदिर या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, सकाळी आरती मंडळ व भाविक यांच्या  वतीने जलाभिषेक रुद्र पूजन महाआरती संपन्न झाली 

 तसेच सभामंडप या ठिकाणी तिन दिवसा शिवलीलाअमृत पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते  पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी सकाळ पासून रांगेच्या माध्यमातून श्री त्रंबकेश्वर महादेवाचे दर्शन घेतले दुपारी किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला  यावेळी देवस्थान पुजारी व  ग्रामस्थ यांच्या मध्ये शाब्दीक बाचाबाची झाली यामुळे ग्रामपंचायत पदाधिकारी ग्रामस्थ काही काळ आक्रमक झाल्याने मंदिरामध्ये  तणावग्रस्त वातावरण निर्माण झाले होते घटनेचे गार्भिर्य ओळखत श्रीरामपुर शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नितीनजी देशमुख यांचे मार्गदर्शखाली पोलिस हवालदार मच्छिंद्र शेलार पो ना किरण टेकाळे भागवत शिन्दे पो कॉ अमोल गायकवाड रविन्द्र शिन्दे शुभम कावरे कुणाल पाचरणे प्रशांत क्षिरसागर  प्रतिक्षा गवई गृहरक्षक दलाचे राजेन्द्र देसाई चंद्रकात मोरकर अरुणा त्रिवेदी आदि पोलिस कर्मचारी यानी चोख बंदोबस्त बजावला  सकाळ पासुनच रात्री उशीरा पर्यन्त भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती  ग्रामस्थ व शिवभक्त यांच्या वतीने भाविकांसाठी सावता महाराज मंदिरामधे खिचडी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close