shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अशोक' च्या ऊस तोडणी मजुरांना चांगल्या आरोग्य सुविधाः पुंजाहरी शिंदे


श्रीरामपूर प्रतिनिधी:
आपल्या घरापासून दूर अंतरावरील साखर कारखान्यांवर ऊस तोडणीसाठी राबणाऱ्या मजुरांचे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष होते, अशावेळी अशोक कारखान्याने या मजूरांसाठी आयोजित केलेले सर्वरोग निदान शिबिर निश्चितच कौतुकास्पद आहे. कारखान्याचे सुत्रधार माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा या मजूरांना सुखसुविधा पुरविण्याबरोबरच त्यांना आरोग्यविषयक बाबी पुरविण्याकडे नेहमीच आग्रह असतो असे प्रतिपादन कारखान्याचे व्हा.चेअरमन पुंजाहरी शिंदे यांनी केले.
तालुक्यातील अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखाना व पंचायत समिती श्रीरामपूर आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय, श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातंर्गत ऊस तोडणी मजूरांसाठी आयोजित सर्वरोग निदान व उपचार शिबिर प्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन श्री.शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे माजी चेअरमन व विद्यमान संचालक सोपानराव राऊत होते. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीच्या माजी सभापती डॉ.सुनिताताई गायकवाड, कारखान्याचे कार्यकारी संचालक संतोष देवकर, को-जन मॅनेजर बाळासाहेब उंडे, ऊसतोडणी कंत्राटदार बाबु चव्हाण, भाऊसाहेब राठोड, हरालाल राठोड आदी उपस्थित होते.

               यावेळी श्री.शिंदे पुढे म्हणाले की, आमचे मार्गदर्शक माजी आ.भानुदास मुरकुटे यांनी ऊस तोडणी मजूरांसाठी मागील हंगामातही सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिरात शेकडो मजूर व त्यांचे कुटूंबियांची त्यावेळी तपासणी करण्यात आली होती. कारखान्याच्या वाटचालीत व प्रगतीत कारखान्याचे सभासद, कामगार यांच्याबरोबर ऊस तोडणी मजूरांचाही सहभाग आहे. याची जान कारखान्याच्या नेतृत्वाला असल्याने ते ऊस तोडणी मजूरांचे तसेच त्यांचे कुटूंबियांची योग्य ती काळजी घेतात.

               प्रारंभी पंचायत समितीचे श्रीरामपूर आरोग्य अधिकारी डॉ.मोहनराव शिंदे यांनी प्रास्ताविक केले.  शिबीरात १२५ महिला व २१० पुरुष अशा एकूण ३३५ ऊस तोडणी मजूरांची तपासणी करुन उपचार करण्यात आलेे. कारखान्याचे केनयार्ड प्रमुख भिकचंद मुठे यांनी सुत्रसंचालन व आभार मानले. शिबिर यशस्वीतेसाठी कारेगाव भागचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर बडाख, कारखान्याचे शेतकी अधिकारी नारायण चौधरी, वैद्यकीय अधिकारी डॉ.मंगेश उंडे, शेतकी ओव्हरसियर किरण काळभोर, संकेत लासुरे, अभिषेक लबडे, राजेंद्र उघडे, योगेश लेलकर यांनी परिश्रम घेतले.

शिबिरात ऊस तोडणी मजूरांवर डॉ.मोहनराव शिंदे, डॉ.उन्मेष लोंढे, डॉ.प्रिती सैंदोरे, डॉ.शामल उंडे, डॉ.प्रतिमा गोर्डे, डॉ.अनुराधा अनाप, आरोग्य सहाय्यक नानासाहेब धनवटे, श्रीमती बार्से सिस्टर, श्रीमती सातपुते सिस्टर, श्रीमती राऊत सिस्टर, श्रीमती थावरे मावशी, श्रीमती दुशिंग मावशी यांनी उपचार केले.

*पत्रकार अफजल मेमन - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close