*कदम विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बनविले पक्षांसाठी फिडर*
इंदापूर:- जागतिक चिमणी दिनाचे औचित्य साधून रयत शिक्षण संस्थेच्या सौ.कस्तराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील सातवीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी हरित सेना उपक्रमांतर्गत पक्षांसाठी खाद्याचे व पाण्याचे फिडर तयार करून विद्यालयाच्या आवारात असणाऱ्या झाडांवर बसविले. टाकाऊ वस्तूपासून हे फिडर तयार करण्यात आले.जवळपास 80 विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला.विद्यालयाचे प्राचार्य संजयकुमार शिंगारे व पर्यवेक्षिका पुष्पा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. हरित सेना विभाग प्रमुख व पर्यावरणप्रेमी शिक्षक सुनील मोहिते यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरणाची आवड निर्माण व्हावी व पक्षी प्रेम जागृत व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविला.विद्यालयाच्या आवारात असणाऱ्या झाडांवर अनेक पक्षी येतात या पक्षांना सहज खाद्य व पाणी मिळावे यासाठी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल पासून खाद्याचे व पाण्याचे फिडर विद्यार्थ्यांकडून बनवून घेतले व परिसरातील झाडांवर ते लावण्यात आले. यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये त्या झाडांवर येणाऱ्या पक्षांना खाद्य व पाणी मिळणार आहे. यासाठी सहाय्यक नितीन मदने यांचे सहकार्य लाभले.