shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

तपस्या व निष्ठेचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे एकलव्य हे होय - आमदार लहू कानडे


श्रीरामपूर प्रतिनिधी:
नरविर तपस्वी म्हणून ख्याती असलेले एकलव्य हे गुरूनिष्ठा व घोर तपस्येचे एकमेव उदाहरण आहे. त्यांचा त्याग हि जगा वेगळा आहे. निष्ठेचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजेच एकलव्य आहे. मी सतत मागासलेल्या वर्गांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. खरे तर याच मागास बांधवांचे नेतृत्व मी करत आहे, त्यातूनच येथील आदिवासी दफन भुमीचा प्रश्न सुटला असला तरी तेथील सर्व प्रश्न सुटलेले नाहीत ते लवकरच सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन आमदार लहु कानडे यांनी व्यक्त केले.

श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे एकलव्य जयंती निमीत्ताने आयोजीत कार्यक्रमात अभिवादनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सचीन गुजर, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर काळे, तालुकाध्यक्ष अरूण पाटील, काँंग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदाम पटारे, भिकाजी पोखरकर, सरपंच शितलताई पटारे व एकलव्य संघटनेचे तालुकाध्यक्ष लहानु मोरे आदि प्रमुख मान्यवर व्यासपिठावर उपस्थीत होते.
आम्ही आता पर्यंत ज्या ज्या गावात मागणी व गरजेप्रमाणे जेव्हढे शक्य होतील तितकी कामे केली. शासनाने दिलेला निधीतून होत असलेली कामे दर्जेदार पद्धतीचे झाले पाहीजे. शासनाचा निधी हा जनतेचा पैसा असतो तो त्याच कामासाठी खर्च झाला पाहीजे, त्यावर कुणीही डल्ला मारता कामा नये अन्यथा त्याचे परीणाम त्यांना भागावेच लागतील. आज जरी सर्वत्र शांतता दिसत असली तरी हि शांतता वादळापुर्वीची आहे हे लक्षात घ्या. त्यापेक्षा ज्यांनी चुका केल्या असतील त्यांनी त्या दुरूस्ती कराव्यात असा सल्ला ही यावेळी आमदार कानडे यांनी दिला.
यावेळी काँग्रेस सेवा दलाचे तालुकाध्यक्ष सुदाम पटारे यांनी भोकर येथील आदिवासी समाजासाठीच्या दफनभुमीचा प्रश्न सुटला असला तरी तेथे संरक्षक भिंतीची नितांत गरज असल्याची मागणी केली तर सरपंच शितल पटारे यांचेवतीने प्रताप पटारे यांनी भोकर गावात गायरान क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. तेथेच लोकवसती वसलेली आहे परंतू शासन निर्णयानुसार गायरान जमीनीवर घरकुल मंजूर होत नसल्याने अनेक कुटूंबांचा निवासाचा प्रश्न प्रलंबीत असल्याचे यावेळी आमदार कानडे यांचे निदर्शनास आणुन दिले.
यावेळी रामदास शिंदे, भाऊसाहेब पटारे, दिलीप पटारे, नारायण पटारे, बाळासाहेब बेरड, दत्तात्रय पटारे, गणेश कांबळे, संदिप गांधले, आप्पासाहेब जाधव, सागर अभंग, भाऊसाहेब भोईटे, राहुल अभंग, राजेंद्र चौधरी, रमेश भालके, विठ्ठल आहेर, राजू लोखंडे, निवृत्ती पटारे, रावसाहेब लोखंडे, निखील कांबळे, पोपट पटारे, बबन आहेर आदिंसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थीत होते.

*
close