shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भोकरला वसुलीस गेलेल्या महावितरणच्या कर्मचार्‍यास शिवीगाळ व दमदाटी


*तालुका पोलीसात एका विरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल

भोकर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथे मार्च एण्डची वसुली करत असलेल्या महावितरणच्या बाह्यस्त्रोत कर्मचार्‍यांना दमदाटी व दगड गोटे फेकुन मारत परत येथे येवू नका असे म्हणत वसुलीस विरोध केल्याप्रकरणी भोकर येथील एका विरुध्द श्रीरामपूर तालुका पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोकर गावात लगतच राहत असलेले चाबुकस्वार कुटूंबाकडे येथील महावितरणचे भोकर सबस्टेशन अंतर्गत वीज बील वसुली व दुरूस्तीचे काम करत असलेले बाह्यस्त्रोत कर्मचारी गजेंद्र कासार व ऋषीकेश तगरे हे दोघे गेले असता संबधीत कुटूंबाकडे गेल्या अनेक महिण्यांपासूनची सुमारे नऊ हजार नऊशे पन्नास रूपये थकबाकी वसुलीसाठी गेले असता रमेश चाबुकस्वार यांचे चिरंजीव प्रकाश चाबुकस्वार याने या दोघा कर्मचार्‍यास शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. यावेळी कासार यांनी आम्ही बिल वसुलीसाठी आलो आहोत, आम्हाला वसुली द्या अन्यथा वरिष्ठांचे आदेशानुसार आम्हाला हे कनेक्शन जमा करून घ्यावे लागेल. आम्ही तुम्हाला अनेकदा सुचना केल्या परंतू आपल्याकडून वसुली रक्कम मिळत नाही, आम्ही कनेक्शन कट केले असता तुम्ही आमच्या परस्पर सदरचे कनेक्शन परस्पर जोडून घेताय त्यामुळे वसुली देत नसल्यास कनेक्शन जमा करून कार्यालयात जमा करावे लागणार आहे.
असे म्हणताच प्रकाश याने आम्हास शिवीगाळ करण्यास सुरूवात केली, कनेक्शनला हात लावू नका असे म्हणत संबधीत कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत कर्मचार्‍यांच्या दिशेने दगडफेक सुरू केली व अर्वाच्य शिवीगाळ करत परत येथे येवू नका असे म्हणत महावितरणच्या कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी गजेंद्र कासार यांनी श्रीरामपूर तालुका पोलीसांत फिर्याद दिल्याने भा.द.वि.सं. क.186, 504 व 506 प्रमाणे अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तालुका पोलीस ठाण्याचे पो.नि.दशरथ चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.काँ.अर्जून बाबर हे करत आहेत.


*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close