विकासाला साथ दिली तरच आपल्या सगळ्यांचा विकास होणार - सुनेत्रा पवार.
इंदापूर: अजितदादा पवार यांनी घेतलेली भूमिका ही कशी बरोबर आहे .हे तुम्हाला समजून घ्यावे लागेल. कारण आजपर्यंत दादांनी कुठलीही चुकीची गोष्ट केलेली नाही. तुम्हाला सांगू इच्छिते की आदरणीय दादांच्या पाठीशी उभा राहण्यासाठी व आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी विकसनशील भारताच्या विकासाच्या रथाचे आपण त्यांचे पाईक होण्यासाठी आपण मिळून आपल्याला प्रयत्न करायचे आहेत. विकासाला साथ दिली तरच आपल्या सगळ्यांचा विकास होणार आहे. म्हणून आपल्या सगळ्यांनाच आपण दादांच्या पाठीशी उभा राहण्याची गरज आहे असे बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्कच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार संभाव्य बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार म्हणून उपस्थित होत्या. त्यावेळी लाखेवाडी येथे गाव भेट संवाद दौऱ्या प्रसंगी उपस्थित असणाऱ्या ग्रामस्थांना त्यांनी आवाहन केले.
यावेळी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या पत्नी सारिका भरणे, जिल्हाध्यक्ष मोनिका हरगुडे, तालुका अध्यक्ष हनुमंत कोकाटे, लाखेवाडी च्या सरपंच चित्रलेखा ढोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर प्रास्ताविक माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीमंत ढोले यांनी लाखेवाडी सह जिल्हा परिषद गटातून जास्तीत जास्त मतदान घडवून आणण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली .
तसेच पुढे सुनेत्रा पवार म्हणाल्या की, मी गेले २५ वर्ष मुंबई, पुणे, बारामती येथे राहते. हे सगळे करत असताना ज्या ज्या जबाबदाऱ्या माझ्यावरती आल्या त्या करून माझं कुटुंब सांभाळून मी समाजकारणामध्ये आले. एखादा उमेदवार आपण ठरवत असताना. तो उमेदवार कसा असावा? कसा असला पाहिजे? त्याला काय येतं येत नाही ते कळलं पाहिजे. एखादी महिला राजकारणी आहे. त्यांचं पात्रता माहिती असणे गरजेचे नसतं. त्याच्या पलीकडे काही गोष्टी माहिती असाव्या लागतात. मी माझी ओळख करून देणं जास्त सोयीस्कर वाटतं. म्हणून मी काय आहे हे सांगणं माझं कर्तव्य आहे. यासाठी मी भेटायला आले आहे . अशा शब्दात त्यांनी गाव भेटीचे कारण स्पष्ट केले.
तसेच त्यापुढे म्हणाले की,माझे माहेर राजकारणी आहे.त्यामुळे सासरी आल्यावरच राजकारण होतं असं नाही .ह्या गोष्टी मला लहानपणापासूनच माहित आहेत. त्यामुळे कुठल्याच गोष्टी मला जड गेल्या नाहीत .माझी मूल मोठी झाल्यानंतर समाजकारणाला सुरुवात झाली. समाजकारण बारामती तालुक्यात केल्यामुळे तसेच समाजकारणाची प्रसिद्धी करण्याची गरज मुळीच वाटली नाही. त्यामुळे कोणालाही सांगण्याचा प्रयत्न केला नाही .बारामती तालुका इंदापूर तालुका यासह सगळीकडे शिक्षणाची सोय चांगली झालेली आहे. बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क याचा उद्देश हाच होता की, महिला सक्षमीकरण, यातून दहावी बारावी शिकलेल्या महिला मुली यांना प्रशिक्षण देऊन रेडीमेड गारमेंट चे कारखाने आहेत. त्या ठिकाणी या महिला काम करतात. खुरपायला जाणाऱ्या बायका ं आज ३० हजार ते ५० हजार पर्यंत पगार मिळवतात. जर असे बारामतीत होत असेल तर सगळ्याच तालुक्यात होईल फक्त गरज आहे.ते तुमच्या पाठिंब्याची. तुम्हाला माहित आहे की आदरणीय दादा जनतेच्या सेवेसाठी अहोरात्र काम करत असताना पाहता. ५ हजार कोटी इंदापूर तालुक्यासाठी दिले. त्यातील लाखेवाडी साठी ३७ कोटी रुपये दिले. या सर्व काही येथे घडण्यासाठी याला सक्षम माणूसच लागतो. त्याच्या पाठिंब्यासाठी आपण सगळ्यांनी उभा राहण्यासाठी त्या गोष्टी पोहोचण्यासाठी सर्वांच्या पाठिंबाची नितांत गरज आहे .तुम्ही हाच पाठिंबा हेच प्रेम तुमच्या मताद्वारे द्याल अशी अपेक्षा करते. ही निवडणूक वेगळी आहे. एका वेगळ्या मोड वरती निवडणूक आणून ठेवलेली आहे. सगळ्यांच्या मनामध्ये एक प्रकारची संभ्रम आहे. आपण सगळेजणच ठरवलेलं आहे. आपण सगळेजण अजितदादांच्या पाठीशी उभे आहात, राहणार आहात, याची खात्री बाळगते अशा शब्दात त्यांनी उमेदवारी संदर्भात आपले मत व्यक्त केले.
यावेळी वैशालीताई पाटील, प्रताप पाटील,सचिन सपकाळ अतुल झगडे, बी एम जगताप नवनाथ रुपनवर, संग्राम पाटील ,संदेश देवकर,शुभम निंबाळकर , सुभाष डरंगे,रेहना मुलानी ,उज्वला परदेशी, माऊली जामदार व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.