(प्रतिनिधी इंदापूर) : इंदापूर येथील डॉ.आंबेडकर नगर मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे २०२४-२५ या वार्षिक कालावधी साठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती कार्यकारिणीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते बुद्धांच्या मुर्तीला पुष्प तर डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती इंदापूर शहर अध्यक्ष पदी सामाजिक युवक कार्यकर्ते बंटीभाऊ सोनवणे यांची एकमताने निवड करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा आरपीआयचे कार्याध्यक्ष शिवाजीराव मखरे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब सरवदे, प्रा.अशोक मखरे, जयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष बाळासाहेब मखरे, वंचित बहुजन आघाडीचे जेष्ठ नेते हनुमंत कांबळे, प्रा.बाळासाहेब मखरे, पुणे जिल्हा आरपीआयचे चिटणीस संदिपान कडवळे, इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक सुहास मोरे, अनिल साबळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी जयंती महोत्सव सोहळा सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्याचे आवाहन केले.
नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष बंटीभाऊ सोनवणे, उपाध्यक्ष अजय मखरे, नितीन मखरे, खजिनदार प्रशांत मखरे, सह खजिनदार आशिश गायकवाड, सचिव सिध्दांत खरे, सह सचिव रजनीकांत लोंढे, कार्याध्यक्ष सुमित मखरे, सह कार्याध्यक्ष दिपक चव्हाण इत्यादी.
बैठकीचे आयोजन माजी अध्यक्ष आनंद मखरे, सचिव शुभम मखरे, खजिनदार सुहास मखरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले होते.