shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भिगवणजवळ सापडली अफूची शेतीभिगवण पोलिसांची कारवाई, एकाला अटक

भिगवणजवळ सापडली अफूची शेती
भिगवण पोलिसांची कारवाई, एकाला अटक
सागर घरत.
प्रतिनिधी:भिगवण, ता. १२: इंदापूर तालुक्यामधील शेटफळगढे गावात भुईमुगाच्या शेतीत अफूची लागवड करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या कारवाईत अफूची १६३ किलो वजनाची बोंडे जप्त करण्यात आली. भिगवण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने हा प्रकार उघडकीस आणला. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली.
शेटफळगढे गावच्या हद्दीतील जमीन गट नंबर.६५ मध्ये ही अफूची शेती करण्यात आली होती. याप्रकरणी रामदास किसन वाबळे,( रा. शेटफळगढे)या शेतकऱ्याला अटक केले  आहे. त्याच्याविरुद्ध भिगवण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच्याकडून  ३,२४,८००हजार रुपये किमतीची अफूची झाडे व बोंडे जप्त करण्यात आली.
भुईमुगाच्या शेतीत अफूची लागवड झाल्याची माहिती भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदेश बावकर यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांचेकडुन पुर्व परवानगी घेवुन तसेच महसुल विभागचे सक्षम अधिकारी यांना बोलावुन घेवुन योग्य त्या पोलीस पथकासह सदर ठिकाणी जावुन छापा घातला असता सदर ठिकाणी जमीन गट नंबर. ६५ मध्ये भुईमुगाच्या पिकात अफुची लागवड करून त्याचे संवर्धन व जोपासना केल्याचे निर्देशनास आले. त्यामुळे सदर ठिकाणी कायदेशीर कारवाई करून १६३ किलो ९०० ग्रॅम वजनाची अफुची झाडे किंमत रूपये ३,२४,८००/- किंमतीचा मुदद्देमाल जप्त करून भिगवण पोलीस स्टेशन, येथे रीतसर गुन्हा दाखल केला असून रामदास किसन वाबळे याला अटक करण्यात आली आहे. अफूचे पीक दिसू नये म्हणून कडेने मका पिकाची लागवड करण्यात आल्याचे आढळून आले.
   सदरची कामगिरी  पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देखमुख,अतिरिक्त पोलीस अधीक्षक संजय जाधव,बारामती विभागाचे पोलिस उपविभागीय अधिकारी सुदर्शन राठोड,यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदेश बावकर, सहा. पो. निरीक्षक रूपेश कदम, पोलीस अंमदालर प्रदीप नलावडे, विजय लोडी, रणजीत मुळीक,अंकुश माने, प्रसाद पवार, महीला पोलीस अंमलदार सारीका जाधव, कल्पना वाबळे यांनी केली आहे.सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रूपेश कदम हे करीत आहेत.
close