shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

ऑनलाईन ट्रेडींग करत असाल तर सावधान - ॲड. चैतन्य भंडारी



जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/रोजगार - नोकरी/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

धुळे - झटपट पैसा कमविण्याचा काळात सर्वसामान्य जनता कोणताही मार्ग अवलंबत आहे त्याची शहानिशा देखील करत नाही. जसे की आजची युवा पिढी ऑनलाईन ट्रेडींग मध्ये पैसे गुंतवणुक करुन झटपट करोडपती बनण्याचे स्वप्न बघत आहे. सोशल मिडीयावर व आपल्या फोन मधील प्ले स्टोअर वर बरेचसे बनावट ट्रेडींग अॅप्लीकेशन आहे व यात गुंतवणुक करुन कमी वेळात आपणास जास्तीत जास्त पैसा मिळतो आणि या नादातच आजची युवा पिढी फसत आहे. त्याचे कारण म्हणजे कमी वेळात दिसणारा जास्त पैसा, सदरील ट्रेडींग अॅप्लीकेशन मार्फत आपण गुंतवणूक केली तर समोरील व्यक्ती काही वेळेस आपल्याला त्याची दुप्पट रक्कम अदा करतो व काही काळानंतर आपली अपेक्षा वाढत जाते व आपण सदरील ट्रेडींग अॅप्लीकेशनमध्ये लाखो किंवा कोटींमध्ये पैसे गुंतवणुक करण्यास सुरुवात करतो आणि तेथेच आपण फसतो. कारण सदरील बनावट ट्रेडींग अॅप्लीकेशन हे आरबीआय व्दारा मान्यताप्राप्त नाहीत. म्हणून कोणतेही ट्रेडींग अॅप्लीकेशन वापरतांना नागरीकांनी त्याची शहानिशा करुन मगच व्यवहार करावेत. 


कोणत्याही ट्रेडींग अॅपवर मोठी रक्कम गुंतवणूक करणे टाळावे आणि शक्यतो बनावट ट्रेडींग अॅपवरुन गुंतवणुक करणे टाळावे व नागरीकांनी सुरक्षित राहावे असे आवाहन सायबर तज्ञ अॅड.चैतन्य भंडारी यांनी केले आहे.
close