श्रीरामपूर प्रतिनिधी:
सालाबाद प्रमाणे यावर्षीही तालुक्यातील कान्हेगांव येथे दि.२० ते २७ मार्च २०२४ रोजी श्री संत तुकाराम महाराज अखंड हरिनाम सप्ताह (वर्ष ६७ वे) सरला बेट महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयजन केले असल्याची माहिती कान्हेगांव ग्रामस्थांनी दिली आहे.
सप्ताह काळात सकाळी ५ ते ६ काकडा, ८ ते १२ तुकाराम गाथा पारायण ,दुपारी ३ ते ४ तुकाराम चरीत्र, सायंकाळी ५ ते ७ हरीपाठ व रात्री ९ ते ११ दररोज किर्तन होणार आहे.
ह.भ.प.कोतकर बापू महाराज, ह.भ.प. रंजाळे बाळासाहेब महाराज, ह.भ.प. बाजारे मयुर महाराज, ह.भ.प. विर महाराज बाबानंद, ह.भ.प. खरात नंदकिशोर महाराज, ह.भ.प. कांडेकर महाराज, ह.भ.प.अमोल बडाख महाराज यांचे किर्तन होणार आहे व बुधवार दि.२७ मार्च २०२४ रोजी काल्याचे किर्तन सरला बेट मठाधिपती गुरूवर्य रामगिरी महाराज यांचे होणार आहे व काल्याचा महाप्रसाद श्री.चांगदेव देवराय (चर्मकार विकास संघ,श्रीरामपूर तालुका अध्यक्ष) यांनी पंगत दिली असल्याचे माहिती आयोजक समस्त कान्हेगांव ग्रामस्थ यांनी दिली आहे.
*ठिकाण:* कान्हेगांव (संत तुकाराम महाराजांचे) ता. श्रीरामपूर जि.अ.नगर
*पत्रकार अमोल आर.शिरसाठ, श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111