shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

अशोक बागुल व बाबासाहेब शेलार यांना शासनाचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार जाहीर


बेलापूर प्रतिनिधी:
महाराष्ट्र शासनाने अनुसुचित जाती अनुसुचित जमाती विमूक्त जाती व भटक्या जमाती ईतर मागासवर्गीय जाती शारिरीक व मानसिक  दृष्ट्या अपंग तसेच समाजकल्याण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार जाहीर झाले असुन श्रीरामपुर तालुक्यात अशोक निवृत्ती बागुल व बेलापुर खूर्द येथील बाबासाहेब देवराम शेलार यांचा या पुरस्कारात समावेश आहे.

अशोक बागुल

बाबासाहेब शेलार

महाराष्ट्र शासनाने अनुसुचित जाती अनुसुचित जमाती विमूक्त जमाती व भटक्या जमाती ईतर मागासवर्गीय जाती शारिरीक व मानसिक दृष्ट्या विकलांग कुष्ठरोगी वगैरेसाठी तसेच समाजकल्याण  क्षेत्रात मौलीक काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याचा गौरव करावा सामाजिक क्षेत्रात कार्य करत असलेल्या  समाजसेवकाच्या कामाची दाखल घ्यावी तसेच इतर कार्यकर्त्यांना त्यापासुन प्रेरणा मिळावी जेणेकरुन सामाजिक उत्थनासाठी कार्यकर्ते पुढे यावेत या उद्देशाने शासनाने सन १९७१-७२ पासुन शासनाने व्यक्तीसाठी डाँ,बाबासाहेब आंबेडकर दलीत मित्र पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला होता कोविड मुळे पुरस्काराची घोषणा होवु शकली नव्हती. आता सन २०१९-२० ,२०२०-२१ ,२०२१-२२ २०२२-२३ अशा चार वर्षाकरीता दिल्या जाणाऱ्या पुरस्कारार्थीची तसेच संस्थाची नावे जाहीर करण्यात आलेली आहे दरवर्षी ५१ व्यक्ती व१० संस्थाना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. त्यात सन २०२०-२१ या वर्षीचा पुरस्कार बेलापुर येथील बाबासाहेब शेलार यांना जाहीर झाला असुन सन २०२२-२३ या वर्षीचा पुरस्कार  श्रीरामपुर शहरातील अशोक बागुल यांना डाँ.बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार घोषित झालेला आहे समाजकल्याण विभागाच्या वतीने पुणे येथे मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार दिला जाणार आहे.

*पत्रकार देविदास देसाई - बेलापूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close