shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

हरिगांव येथे इस्टरपर्यंत उपवास काळात विविध धार्मिक कार्यक्रम


श्रीरामपूर प्रतिनिधी:
तालुक्यातील हरेगांव येथील संत तेरेजा चर्च मतमाउली भक्तीस्थानाचेवतीने ईस्टर सण निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

सध्या इस्टर निमित्त ख्रिस्त धर्मिय बांधवांचा उपवास काळ सुरु झाला असून दिनांक ४ मार्च पासून प्रार्थना प्रवचन,पवित्र मिस्सा बलिदान आदी धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. दिनांक ४ मार्च रोजी बेलपिंपळगांव,पाचेगांव,टाकळीभान, दि.५- रोजी टाकळीभान, कमालपूर,,या ठिकाणी कार्यक्रम झाले आहेत, दि ७ रोजी- भोकर, दि. ११ रोजी वडाळा महादेव,दि. १२ रोजी माळवाडगांव,दि. १४ रोजी खारीनिमगाव,दि. १८ रोजी प्रगतीनगर,दि. १९ रोजी मतमाउली विभाग उंदीरगाव, याठिकाणी प्रार्थना प्रवचन आयोजित करण्यात आले आहेत. त्यात फा.डॉमनिक, रिचर्ड, सचिन,आदी धर्मगुरू प्रवचन करणार आहेत.दिनांक २२ रोजी सायंकाळी- ५.३० वा.पवित्र क्रुसाच्या वाटेची भक्ती,दि. २३ रोजी पवित्र मिस्सा व प्रबोधन, दि.२४ रोजी सकाळी ६.४५  झावळ्याचा रविवार, मिरवणूक,दि. २८ रोजी आज्ञा गुरुवार, दि.२९ रोजी उत्तम शुक्रवार [गुड फ्रायडे] पवित्र क्रुसाच्या वाटेची भक्ती,सात शब्दावर चिंतन,दि. ३०रोजी पवित्र मरीयेचे दु:ख सहन चिंतन, दिनांक ३० मार्च ईस्टर सण, रात्रीचा मिस्सा,दि.३१ मार्च रोजी ईस्टर सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल या सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन प्रमुख धर्मगुरू फा. डॉमनिक,व सचिन,रिचर्ड आणी पदाधिकारी यांनी केले आहे.

*ज्येष्ठ पत्रकार बी.आर.चेडे - शिरसगांव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close