shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

वडाळा महादेव येथे उपचारा अभावी बिबट्याचा मृत्यू - ग्रामस्थांनी केली वन विभाग अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी..


*पो.कॉं मच्छिंद्र शेलार आणी ग्राम महसूल अधिकारी (कामगार तलाठी) राजेश घोरपडे यांचे नागरीकांना शांतता व सतर्कतेचे आवाहन

श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील वाघ वस्ती गट नं १२ अ  परिसरामध्ये बिबट्याचा उपचाराअभावी मृत्यू झाल्याची दुदैवी घटना घडली आहे.
येथील वाघ वस्ती या ठिकाणी गेल्या दोन ते तीन दिवसापासून सदरचा बिबट्या मृत्यूची झुंज देत  असल्याचे शेतकरी वाघ यांना आढळून आले, त्यानंतर श्री. वाघ यांनी घटनेची माहिती वडाळा महादेव येथील ग्रामपंचायत पदाधिकारी यांना कळविली, यावरून ग्रामस्थांनी घटनास्थळी भेट देत सदरची माहिती वनविभाग वनाधिकारी यांना देण्यात आली यावरून वनाधिकारी प्रतिभाताई पाटील, श्री.सानप यांनी आत्ता येतो, थोड्या वेळाने येतो असे सांगत दोन दिवस ग्रामस्थांना फोनवरूनच उडवाउडवीची माहिती देत राहिले,यावेळी सदरचा बिबट्या मृत्यूशी झुंज देत  दिनांक ५ रोजी सकाळी साडेदहा ते अकरा वाजेच्या दरम्यान मृत पावला आहे.


 शासकीय कायद्यामुळे ग्रामस्थांनी  बिबट्यापासून दूर राहण्याचे धोरण अवलंबिले तसेच बिबट्याच्या हालचालीवर परिसरातील नागरिकांनी लक्ष ठेवले परंतु उपचारा अभावी बिबट्याच्या मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.याबाबत संतप्त ग्रामस्थांनी वनविभाग अधिकारी यांचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी यावेळी केली. यापूर्वीही वडाळा महादेव येथे बिबट्याने अनेक व्यक्तीवर तसेच जनावरावर हल्ला केला आहे. यापूर्वी येथील गावांमध्ये झाडावर बसलेला बिबट्या काढण्यासाठी पोलीस प्रशासन तसेच पत्रकार राजेन्द्र देसाई यांनी स्वतःचा जिव धोक्यात घालून बिबट्यास खाली उतरवले होते,परिसरात मोठ्या संख्येने बिबट्या नर मादी पिल्ले असुन वनविभाग अधिकारी फोन करूनही येण्यास टाळाटाळ करतात तसेच मोबाईल नंबर बदलतात यामुळे नागरीकांची मोठी कुचंबना होत असल्याचे दिसत आहे,यासंदर्भात वडाळा महादेव येथील माजी सरपंच सचिन पवार, दादा झिंज, भरत पवार,आप्पासाहेब वाघ, सतिश लगे, रवी लगे, संजय कसार  यांनी वन विभागाच्या उदासीन कारभारामुळे उपचाराअभावी मृत्यू झालेल्या बिबट्याच्या मृत्यूबाबत संबंधित वन विभागाच्या निषेधार्थ दोषी अधिकारी यांच्यावर प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

 यावेळी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार मच्छिंद्र शेलार आणी ग्राम महसूल अधिकारी (कामगार तलाठी) राजेश घोरपडे यांनी नागरिकांना शांतता व सतर्कतेचे आवाहन केले. सदरचा मृत बिबट्याचा पंचनामा करून नागरिकांनी वन अधिकारी यांच्या स्वाधीन केले.

*पत्रकार राजेंद्र देसाई - वडाळा महादेव
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close