shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

भोकर शिवारात रिक्षा व मोटार सायकलची धडकेत एकाचा मृत्यू


मयत माळवाडगांव येथील जेसीबी चालक तरूण, रिक्षातील घोडेगांव व चांदा येथील दोन महिला किरकोळ जखमी

श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारातील हनुमानवाडी परीसरात माल वाहतुक रिक्षा व मोटार सायकल धडकेत माळवाडगांव येथील जेसीबी चालक असलेला कुटूंबाचा आधार असलेला एकुलता एक गौरव दांगट याचा मृत्यू झाला, तर माल वाहतुक रिक्षातील चांदा व घोडेगांव येथील दोन महिला जखमी झाल्या. किरकोळ जखमी असलेल्या महिलांची प्राथमिक उपचारानंतर गावाकडे रवानगी करण्यात आली. सुदैवाने रिक्षातील मुले सुखरूप आहेत. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत श्रीरामपूर तालुका पोलीसांत गुन्हा दाखल नव्हता.

नेवासा तालुक्यातील चांदा व घोडेगांव येथील एक पुरूष, तीन महिला व तीन मुले असे सात जण टाटा एसीई क्र.एम एच १७ एजी ५८६२  या माल वाहतुक रिक्षाने माळवाडगांव येथील एका नातेवाईकास भेटण्यासाठी गेलेले होते. तेथून काल गुरुवार दि.२९ फेब्रुवारीच्या सायंकाळी सात वाजेच्या सुमारास चांदाकडे जात असताना भोकर शिवारातील हनुमानवाडी परीसरात खोकरफाटा ते खानापूर रोडवर समोरून येणार्‍या मोटार सायकल क्र.एम एच १७ ए एस २६८९ यांची जोराची धडक झाली. यात मोटार सायकल चालकाला वाचविण्याच्या प्रयत्नात मालवाहतुक करणारी रिक्षा उलटली.

ही धडक इतकी जोराची होती की त्यात मोटार सायकल वरील माळवाडगांव येथील जेसीबी चालक असलेला व दांगट कुटूंबाचा आधार असलेला एकुलता एक गौरव नानासाहेब दांगट हा गंभीर जखमी झाला त्यास हनुमानवाडी येथील डॉ. सागर अभंग, मारूती शिंदे, गणेश कांबळे, संदिप निंबाळकर, ग्रामविकास अधिकारी संजय बारसे, आप्पासाहेब शिंदे आदिंसह परीसरातील महिला व पुरूषांनी अपघात स्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली. यात रिक्षातील चांदा येथील जया संजय फरसाळे व घोडेगांव येथील रोहीणी राधाकीसन सावंत या दोघींना चांगलीच दुखापत झाली. 
गंभीर जखमी गौरव दांगट यांस रूग्णवाहीका वेळेत उपलब्ध न झाल्याने परीसरातील सुज्ञ नागरीकांनी खाजगी वाहनाने तातडीने प्रथम श्रीरामपूर येथील साखर कामगार हॉस्पीटल मध्ये उपचारासाठी रवाना केले तेथून पुढील उपचारासाठी लोणी येथील प्रवरा हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले दुर्दैवाने रात्री उशीराने गौरव याची प्रवरा हॉस्पीटल मध्ये प्राण ज्योत मालवली. गौरव दांगट (वय २३) हा अविवाहीत व एकुलता एक मुलगा होता. त्याचे पश्चात वृद्ध आई, वडील, दोन विवाहीत बहीणी असा परीवार आहे. त्यांचे निधनाने परीसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

तर काही वेळाने येथील तरूणांच्या समुहाने उलटलेली रिक्षा सरळ करून दिल्याने जखमी महिलांसह सर्वजण नेवासाकडे रवाना झाले. हा अपघात कसा घडला हे समजू शकले नाही. या प्रकरणी रात्री उशीरापर्यंत श्रीरामपूर तालुका पोलीसांत गुन्हा दाखल नव्हता.

*पत्रकार चंद्रकांत झुरंगे - भोकर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close