shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

१० मार्च रोजी श्रीरामपूरमध्ये मोफत महा आरोग्य शिबीर

श्रीरामपूर प्रतिनिधी:
श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील तमाम जनतेसाठी एस.एम.बी.टी. हॉस्पिटल घोटी व करेज फाउंडेशन श्रीरामपूर आयोजित मोफत महा आरोग्य तपासणी शिबिर प्रथमच आपल्या श्रीरामपूर शहरात संपन्न होत आहे.

शिबिर रविवार दि.१० मार्च २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी ०३ वाजेपर्यंत डी.डी. काचोळे माध्यमिक विद्यालय तथा जनता हायस्कूल नॉर्दन ब्रांच श्रीरामपूर येथे असेल.

सदर शिबिराचे उद्घाटन उपजिल्हा रुग्णालय श्रीरामपूरचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश बंड हे करणार आहेत.
या शिबिरात हृदयरोग,बालरोग कान, नाक,घसा,नेत्ररोग, त्वचारोग, स्री रोग,सर्जरी, मेडिसिन या आजारा संदर्भातील तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.
  दरम्यान एस एम बी टी येथील तज्ञ डॉक्टरांद्वारे तपासणी व मार्गदर्शन, मोफत इसीजी, मोफत शुगर बीपी तपासणी, मोफत ब्लड ऑक्सिजन या तपासण्याची सुविधा असणार आहे. तपासणी केल्यानंतर आवश्यक असल्यास पुढील उपचार किंवा शस्त्रक्रिया हॉस्पिटल मार्फत पूर्णपणे मोफत असणार आहे. एस. एम. बी. टी. हॉस्पिटल घोटी येथे महात्मा ज्योतिबा फुले व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना लागू आहे असून रुग्णांची श्रीरामपूर ते घोटी जाण्या येण्याची मोफत व्यवस्था केली जाणार आहे.तरी शहरासह तालुक्यातील तमाम बंधू-भगिनींनी बहु संख्येने या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करेज फाउंडेशन श्रीरामपूर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

  शिबिर यशस्वीतेसाठी ॲड. समीन बागवान, अमोल पिंगळे कॉ. जीवन सुरुडे, रविंद्र त्रिभुवन,डॉ. तौफीक शेख,ॲड. ऋषिकेश बोरडे,मुदस्सर शेख, मेहबूब शेख, कॉ. श्रीकृष्ण बडाख, शाबाज रंगरेज,ॲड. मोहसिन पठाण, अबुज़र पठाण, अज़हर सय्यद, दिलावर बागवान, तौसीफ़ शेख,जब्बार बागवान, जावेद पठाण, रियाज बागवान,आदी प्रयत्नशील आहेत.

*पत्रकार जावेद सलिम शेख - श्रीरामपूर
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close