shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

रणसिंग महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा

रणसिंग महाविद्यालयात विज्ञान दिन साजरा
फोटो ओळ - कळंब ता इंदापूर येथे विज्ञान दिन प्रसंगी उपस्थित मान्यवर......
इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे विश्वासराव रणसिंग महाविद्यालयमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनाचे  औचित्य साधून विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.भौतिकशास्त्रज्ञ सी.व्ही.रमण यांच्या प्रतिमेचे पूजन व विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे इंदापूर तालुका ग्रामविकास प्रतिष्ठानचे सचिव  वीरसिंह रणसिंग उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुशराव आहेर उपस्थित होते.विज्ञान प्रदर्शनामध्ये प्रकल्प,फळ कोरीव काम,फुले सजावट, पोस्टर्स अशा विविध प्रकारच्या संशोधनात्मक कलाकृतींचे प्रदर्शन भरवण्यात आले होते.
       विज्ञान प्रकल्पामध्ये तृतीय वर्ष विज्ञान या वर्गातील विद्यार्थी कु.कृषिराज सर्जेराव शिंदे याने माती विना शेती (हायड्रोफोनिक फार्मिंग) मॉडेल तयार केले होते , द्वितीय वर्ष विज्ञान या वर्गातील तस्लीम शब्बीर शेख  व दिक्षा गुणवंत रणमोडे  विद्यार्थीनींनी Water Recycling  मॉडेल तयार केले होते. तसेच  fruit Carving मध्ये Black Pearl, Brain, Caterpillar, Exceretory system, onion Lotus , Human face, Starfish, Cherry Blossom इत्यादी कलाकृती तयार केल्या होत्या.विद्यार्थ्यांनी  विज्ञान प्रदर्शनामध्ये  विविध पोस्टर्स तयार केले होते. विज्ञान प्रदर्शनामध्ये विद्यार्थीनी  बनवलेल्या संशोधनात्मक कलाकृतींची पाहणी करत असताना मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे कौतुक केले.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विभाग प्रमुख  प्रा.मयुरी पाटील यांनी केले. तृतीय वर्षातील विद्यार्थिनी सायली दळवी  व वैष्णवी कदम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतामध्ये महाविदयालयाच्या प्राचार्यानी वैज्ञानिक दृष्टिकोन विद्याथ्यार्थ्यांसमोर मांडला, नवीन शैक्षणिक धोरण याविषयी बोलत असताना संशोधना मध्ये  येणाऱ्या नवनवीन आव्हानांविषयी माहिती सांगितली व  विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन केले.
         कार्यक्रमप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अंकुश आहेर, उपप्राचार्य  प्रा.ज्ञानेश्वर गुळीग , आय.क्यू.ए.सी.समन्वयक डॉ. प्रशांत शिंदे विद्यार्थी विकास मंडळ अधिकारी प्रा. राजेंद्रकुमार डांगे, शारिरीक शिक्षण व क्रिडा विभाग प्रमुख डॉ. सुहास भैरट इ मान्यवर तसेच 
महाविदयालयातील  विभागप्रमुख, सहकारी प्राध्यापक व  प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी ८०  विद्यार्थी व १६ प्राध्यापकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. मयुरी मोहन रासकर व आभार प्रदर्शन समृद्धी संतोष संतोष चव्हाण यांनी केले.


close