इंदापूर: जय भवानीगड विकास प्रतिष्ठान संचलित प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल लाखेवाडी मध्ये सिनियर के .जी सी.बी.एस.ई. च्या विद्यार्थ्यांचा दि. २८ मार्च रोजी ग्रॅज्युएशन डे आयोजित करण्यात आला . प्रशालेतील मान्यवरांनी विद्येची आराध्य देवता असणारी सरस्वतीचे प्रतिमा पूजन केले. प्रशालेतील छोट्या बालचमुंनी आजच्या धावत्या युगामध्ये मोबाईलचा वाढता वापर व त्याचा विद्यार्थ्यांवर विपरीत परिणाम कसा होतो, हे एका छोट्या नाटिकेद्वारे सादर केले. त्याबरोबरच आपल्या बोबड्या भाषेत मनोगत व्यक्त केले .आकर्षक नेत्र दीपक नृत्य सादरीकरण केले. विद्यार्थ्यांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवण्यात आले.हसत खेळत पूर्व प्राथमिक शिक्षणातून खऱ्या अर्थाने प्राथमिक शिक्षणाच्या पायरी वाटचाल करण्यास हे बालचमु सज्ज झाले.
विद्यार्थी ,लहान मुले हे अनुकरणप्रिय असतात ;ते थोर व्यक्तींचे ,मोठ्यांचं अनुकरण करून त्याप्रमाणेच वागण्याचा प्रयत्न करतात ,मग त्यांच्यासमोर थोरामोठ्यांनी एक चांगले आदर्शवत वर्तन करून ,त्यांच्यासमोर एक चांगला आदर्श निर्माण करावा जेणेकरून आजचा हा छोटा बालक उद्याचा सुजाण नागरिक होईल. चांगला नागरिक घडून आपल्या देशाची सेवा करेल. विद्यार्थ्यांवर अभ्यासाचं दडपण न आणता इतर मुलांबरोबर आपल्या पाल्याची तुलना न करता आपला पाल्य त्याच्या कुवतीनुसार शिकेल व त्यासाठी पालकांची साथ व शिक्षकांनी योग्य प्रकारे मार्गदर्शन करणे हा खरा अर्थाने या कार्यक्रमाचा उद्देश आहे. असे संस्थेच्या उपाध्यक्ष चित्रलेखा ढोले मॅम यांनी आपल्या मनोगतातून सांगितले .
जय भवानीगड विकास प्रतिष्ठान,लाखेवाडी संस्थेचे अध्यक्ष तथा मा.सदस्य जि.प.पुणे श्रीमंत ढोले सर,संस्थेच्या उपाध्यक्षा व लाखेवाडीगावच्या विद्यमान सरपंच चित्रलेखा ढोले मॅडम,संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे साहेब ,संस्थेचे प्रमुख सल्लागार प्रदीप गुरव साहेब,संस्थेचे जनसंपर्क अधिकारी गणेश पवार सर,फार्मसी कॉलेजचे प्राचार्य सम्राट खेडकर सर व प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल चे प्राचार्य राजेंद्र सरगर सर सर्व सुपरवायझर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद, विद्यार्थी, पालक यांच्या उपस्थितीत ग्रॅज्युएशन डे उत्साहात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता साबळे मॅडम व लता कचरे मॅडम यांनी केले.