shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

मराठा सेवा संघाच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी प्रमोद देशमुख तर राजश्री शाहू शिक्षण परिषद कक्ष इंदापूर तालुकाध्यक्ष पदी सागर जाधव यांची नियुक्ती.

मराठा सेवा संघाच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी  प्रमोद देशमुख तर  राजश्री शाहू शिक्षण परिषद कक्ष इंदापूर तालुकाध्यक्ष पदी सागर जाधव यांची नियुक्ती.
इंदापूर:-  अनुसया सामाजिक प्रतिष्ठान संचलित ज्ञानदीप पॅरामेडिकल कॉलेज इंदापूर येथे मराठा सेवा संघाचे पुणे जिल्हा ग्रामीण चे अध्यक्ष  राहुल घोगरे यांच्या अध्यक्षते खाली घेण्यात आलेल्या बैठकीत मराठा सेवा संघाच्या इंदापूर तालुका अध्यक्ष पदी  प्रमोद देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच मराठा सेवा संघ प्रणित राजश्री शाहू शिक्षण परिषद कक्ष इंदापूर तालुकाध्यक्षपदी  सागर  जाधव यांची नियुक्ती करण्यात आली. 

यावेळी मराठा सेवा संघाचे  प्रमोद जगताप ,  प्रवीण वाणी,  शरद आगलावे,  माधव माने,  महेश आवताडे,  तुषार घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
 यावेळी उपस्थित मान्यवरांना वैचारिक पुस्तके भेट  व सर्वांना मराठा सेवा संघाची शिवधर्म दिनदर्शिका २०२४ भेट म्हणून देण्यात आले . तसेच  प्रमोद  देशमुख आणि  सागर जाधव यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या  पुढील कार्यास मराठा सेवा संघ इंदापूरच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
close