shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

सुंदरबन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, कोलकता, पश्चिम बंगाल येथे आज चित्रपटांचे निकाल जाहीर


सासुबाईचा साखरपुडा या मराठी चित्रपटाचे प्रमूख अभिनेता आशुतोष गोरे यांना बेस्ट ॲक्टर ॲवार्ड

मुंबई प्रतिनिधी:
सुंदरबन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल, कोलकता, पश्चिम बंगाल येथे आज चित्रपटांचे निकाल जाहीर झाले असून सासुबाईचा साखरपुडा या मराठी चित्रपटाचे प्रमूख अभिनेते आशुतोष गोरे यांना बेस्ट ॲक्टर ॲवार्ड जाहीर झाला आहे,


याविषयी आशुतोष म्हणाले की, सासूबाईचा साखरपुडा चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, सहकलाकार तसेच संपूर्ण टीममुळेच सदरचे ॲवार्ड मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले तसेच नुकतेच विदर्भ इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल मध्ये सासुबाईचा साखरपुडा चित्रपट बेस्ट फिल्म म्हणून ॲवार्डेड झाल्याने आनंद द्विगुणित झाला असल्याचे ते म्हणाले.डॉ.दिलीप आबनावे निर्माता, दिग्दर्शक,अभिनेता असून कथा पटकथा संवाद बाळासाहेब गोरे, दिलीप प्रभुणे यांचे आहे,
चित्रपटात आशुतोष गोरे, श्रध्दा, संगीता पिंगळे, संजीवनी कोंडे देशमुख, पर्व बागमार, अरूण पटवर्धन, दिलीप हळ्याल, पूनम पवार , गितांजली डोंबे, तारा डाके, डॉ. धनंजय मेहेत्रे, संगीता गुणवंत, रंजना पोवार आदि कलाकार आहेत.

सासुबाईचा साखरपुडा हा चित्रपट महाराष्ट्रात थिएटरमध्ये प्रदर्शित होत असून प्रत्येक शहरांत चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया उत्कृष्ट चित्रपट,एक पाऊल समाज घडविण्यासाठी टाकल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्रात सासुबाईचा साखरपुडा चित्रपट प्रदर्शित करतांना एका शहरात एकाच थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात येत आहे त्यामुळे एक नवीन पद्धती अवलंबली जात असल्याचे दिसून येत आहे.

*संकलन*
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close