shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball

About Me

जयंती हनुमान टाकळी येथे वीर एकलव्य जयंतीउत्साहात साजरी

पाथर्डी प्रतिनिधी:
पाथर्डी तालुक्यातील हनुमान टाकळी येथील एकलव्य मंडळातर्फे वीर एकलव्य जयंती चे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष अरविंद सोनटक्के, तालुका अध्यक्ष रवींद्र उर्फ भोरू मस्के तसेच तालुका महासचिव संजय कांबळे,नंदू कांबळे, व्ही. आर. गायकवाड, भाऊराव जाधव,प्रवीण शिरसाट, रामदास पवार, सचिन माळी, संतोष जाधव, श्यामा पवार, शंकर जाधव, अंकुश जाधव, किसन जाधव, शिवाजी जाधव,योसेफ मेजर,देवदान निकाळजे आदी हजर होते.

कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सरपंच संजू भाऊ शिरसाठ होते  विरएकलव्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून अरविंद सोनटक्के रवींद्र उर्फ भोरु म्हस्के, संजय कांबळे , प्रवीण शिरसाठ व्ही आर गायकवाड यांनी आपले विचार व्यक्त केले.

यावेळी बोलताना अरविंद सोनटक्के म्हणाले की, महाभारत काळामध्ये वीर एकलव्याने गुरु नसताना देखील जी विद्या ग्रहण केली त्याला तोड नाही, एका राजपुत्राला मोठं करण्यासाठी त्यांचे गुरु असणाऱ्या द्रोणाचार्यांनी सापत्न वागणूक देऊन महान असणाऱ्या धनुर्धर वीर एकलव्याला नाकारण्याचे काम केले व एका राजाच्या मुलाचे मोठेपण सिद्ध करण्यासाठी कपटाने न शिकवलेल्या विद्येच्या बदल्यात अंगठ्याचे दान गुरुदक्षिणा म्हणून मागून घेतले परंतु अंगठ्याचं दान देऊनही एकलव्य धनुर्धर म्हणून त्याही वेळेस श्रेष्ठच होते परंतु असं दान घेणारे गुरु कपटी मिहनुनच गणले गेले आजही आपल्या समाजात असे गुरू आहेत बहुजन समाजाने सावध होऊन अशा गुरूंना आता आपल्या अंगठ्याचे दान देता कामा नये, आजही आपल्या समाजामध्ये जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करून धन दांडग्यांच्या मुलांचे व सामान्य माणसाचे शिक्षण आजही वेगळे आहे  याकडेही आपण आता दुर्लक्ष करता कामा नये, आपला जर विकास करायचा असेल तर शाहू फुले आंबेडकरांच्या मार्गाने जावे लागेल आणि शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा खरा गुरु मंत्र आपल्याला जो बाबासाहेबांनी दिला त्याच मार्गाने जाऊन आपला स्वतःचा विकास करावा लागेल.
प्रास्ताविक सचिन माळी यांनी तर आभार अण्णासाहेब दगडखैर यांनी मानले.

*पत्रकार वजीरभाई शेख - पाथर्डी
*सहयोगी* स्वाभिमानी संपादक सेवा संघ
*संकलन
समता न्यूज नेटवर्क,श्रीरामपूर - 9561174111
close